Monday, July 1, 2024
Homeब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय; राज्यातील प्रत्येकाला आता ५ लाखांपर्यंत मोफत उपचार

महाराष्ट्र राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय; राज्यातील प्रत्येकाला आता ५ लाखांपर्यंत मोफत उपचार

नऊ कोटी ६२ लाख सात हजार ७४३ एवढी लाभार्थ्यांची संख्या

संकेतस्थळावर राज्यातील १९०० रुग्णालयांची यादी उपलब्ध

कर्करोग, ह्दयरोग, शस्त्रक्रिया, सांधेदुखी या आजारांचाही योजनेत समावेश

मुंबई : अंत्योदय, पिवळे, केशरी रेशनकार्डधारकांसह आता शुभ्र रेशनकार्ड असलेल्या कुटुंबांना देखील पाच लाख रुपयांपर्यंत दरवर्षी मोफत उपचार मिळणार आहेत. राज्य शासनाने त्यासंदर्भातील आदेश नुकताच काढला असून योजनेत आता तीन कोटी लाभार्थींची वाढ झाली आहे. राज्य शासनाच्या नवीन निर्णयानुसार आता महात्मा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे लाभार्थी एकूण नऊ कोटी ६२ लाख सात हजार ७४३ एवढी झाली आहे.

राज्यातील जनतेला घरपोच आरोग्य सेवा अधिक चांगल्या पद्धतीने देण्यासाठी आणि नागरिकांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी सरकारने ‘महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना सुरू केली होती. गेल्या वर्षी जूनमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेतील विमा संरक्षित रक्कम दीड लाखांवरून पाच लाख रूपये करण्याचा निर्णय घेतला. लाभासाठी शिधापत्रिका (रेशन कार्ड) किंवा अधिवास प्रमाणपत्र (डोमासाईल) आवश्यक असणार आहे.

या कागदपत्रांची पुर्तता करणाऱ्यांनी विम्याचे संरक्षण मिळेल. योजनेत विविध कर्करोग, ह्दयरोग, शस्त्रक्रिया, सांधेदुखी असे प्रमुख आजारदेखील समाविष्ठ करण्यात आले आहेत. योजनेच्या लाभासाठी मात्र लाभार्थींकडे आयुष्यमान गोल्डनकार्ड असणे बंधनकारक आहे.

सरकार दरवर्षी तीन हजार कोटी खर्च करणार

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत आतापर्यंत दीड लाखांचे विमा संरक्षण मिळत होते. आता या योजनेचा विस्तार करण्यात आला असूनआ युनायटेड इंडिया ॲश्युरन्स या विमा कंपनीला काम देण्यात आले आहे. सरकार विमा कंपनीला प्रति कुटुंब तेराशे रुपये प्रीमियम म्हणून देणार आहे. यासाठी सरकारी तिजोरीतून दरवर्षी तीन हजार कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.

राज्यातील १९०० रूग्णालयात मिळतील मोफत उपचार

राज्यातील एक हजार ९०० रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेता येणार आहे. योजनेअंतर्गत रुग्णाला उपचार घेण्यासाठी संलग्नित रुग्णालयात जावे लागणार आहे. https://www.jeevandayee.gov.in या संकेतस्थळावर योजनेतील रुग्णालयांची यादी उपलब्ध आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला नेटवर्क हॉस्पिटलच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल, त्यानंतर जिल्हा निवडल्यानंतर रुग्णालयांची संपूर्ण यादी दिसेल.

योजनेतील लाभार्थींची स्थिती

‘पीएमजेएवाय’चे लाभार्थी
३,२६,८९,३२४

अंत्योदय, केशरी, पिवळे कार्डधारक
३,४२,७८,२४६

शुभ्र रेशनकार्डधारक
२,९२,४०,१७३

एकूण लाभार्थी
९,२६,०७,७४३

गोल्डनकार्ड जरूरी आहे

राज्य सरकारच्या नवीन निर्णयामुळे आता पांढरे रेशनकार्ड असलेल्यांनाही जनआरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी लाभार्थींनी ‘आयुष्यमान गोल्डन कार्ड’ काढून घ्यावे आणि योजनेचा लाभ घ्यावा. जवळपास १३०० आजारांवर या योजनेतून मोफत उपचार मिळणार आहेत. – डॉ. माधव जोशी, जिल्हा समन्वयक, जनआरोग्य योजना, सोलापूर

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -