Alka Yagnik : प्रसिद्ध गायिका अलका याग्निक यांना अचानक आला बहिरेपणा!

विमानतळावर उतरल्या आणि दोन्ही कानांनी ऐकू येणंच बंद झालं...


मुंबई : बॉलिवूडमध्ये (Bollywood) आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करुन सोडणाऱ्या गायिका अलका याग्निक (Singer Alka Yagnik) यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. अलका याग्निक यांना एका दुर्मिळ आजाराने ग्रासले असून त्यामुळे त्यांना दोन्ही कानांनी ऐकू येणं बंद झालं आहे. त्यांनी स्वतः आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन (Social media handle) याबाबत माहिती दिली आहे.


अलका याग्निक यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, एका विमान प्रवासातून मी बाहेर आले आणि मला काही ऐकू येईनासं झालं. या घटनेनंतर मी बरेच दिवस काही काम करताना दिसले नाही त्यामुळे माझी चौकशी करणाऱ्या माझ्या हितचिंतकांसमोर व चाहत्यांसमोर खूप हिंमत गोळा करुन मी अखेर मौन सोडत आहे. मला एक मेंदूचा दुर्मिळ आजार झाला असून सेन्सरी नर्व्ह हिअरिंग लॉस असं निदान डॉक्टरांनी केलं आहे. या अचानक झालेल्या मोठ्या आघाताने मला धक्का बसला आहे. मी त्याच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असताना कृपया माझ्यासाठी प्रार्थना करा, असं त्यांनी म्हटलं आहे.



का बळावला हा आजार?


अलका याग्निक यांनी आपल्या पोस्टमध्ये या आजारामागील कारण देखील सांगितलं आहे. त्या म्हणतात, कानात सतत मोठ्याने आवाज ऐकल्यामुळे हा आजार बळावला. त्यामुळे चाहत्यांना आणि तरुण सहकाऱ्यांना मोठ्याने हेडफोनवर गाणी ऐकणं टाळा असं आवाहनही त्यांनी केलं आहे. तुमच्या सर्वांच्या प्रेमाने आणि पाठिंब्याने मी माझे आयुष्य पुन्हा व्यवस्थित करून लवकरच तुमच्याकडे परत येईन अशी आशा आहे. तुमचा पाठिंबा आणि समजूतदारपणा या कठीण काळात माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, अशा भावना त्यांनी या पोस्टमध्ये व्यक्त केल्या आहेत.


अलका याग्निक यांच्या पोस्टवर चाहत्यांनी चिंता व्यक्त केल्या आहेत. गायक सोनू निगम, गायिका-अभिनेत्री इला अरूण यांनीदेखील अलका यांच्या चांगल्या प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.

Comments
Add Comment

नवी मुंबईचा प्रवास वेगवान होणार, ठाणे-बेलापूर मार्गावरील प्रवास आता सिग्नलमुक्त

नवी मुंबई: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिकेने एका महत्त्वाच्या प्रकल्पाला मंजुरी

महापालिकेच्या टाऊनहॉल जिमखान्याचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने महापालिका मुख्यालयासमोरील आझाद मैदान येथील जुन्या क्रिडा भवनाच्या जागेवर

कुलाबा सांडपाणी प्रकल्पातील प्रक्रिया ३ दशलक्ष लिटर पाण्याची होणार विक्री

मुंबई: कुलाबा मल जल प्रक्रिया केंद्रात प्रकल्पातून पिण्याव्यतिरिक्त अन्य कामांसाठी प्राप्त होणाऱ्या १० दशलक्ष

मिठी नदीच्या कामाला येत्या १ एप्रिलपासून होणार सुरुवात

मुंबई: मुंबईतील २६ जुलैच्या महापुराला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीतील गाळाची सफाई करण्यासाठी आतापर्यंत कंपन्याच

मुंबईत आतापर्यंत सुमारे ८८ टक्के मालमत्ता कर वसुली

मुंबई: मंगळवार २४ मार्च २०२६ पर्यंत एकूण ६ हजार ४४९ कोटी रुपये म्हणजेच निर्धारित उद्दिष्टाच्या ८७.८६ टक्के इतका

मुंबईतील चारही प्रवेशद्वार सुशोभीकरणाची संकल्पना पुढील १५ दिवसात सादर करा; महापौर रितू तावडे यांचे प्रशासनाला निर्देश

मुंबई: मुंबईतील दहिसर, वाशी, ऐरोली आणि मुलुंड येथील प्रवेशद्वारांची उभारणी, सुशोभीकरणासह परिसर व पर्यटन