Mobile: दिवसभरात किती तास वापरला पाहिजे मोबाईल फोन? तुम्हाला माहीत आहे का...

मुंबई: आजच्या काळात मोबाईल फोन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. संपूर्ण दिवस हल्ली सगळेच मोबाईलवर असतात. जर एक मिनिटही फोन आपल्या हातात नसेल तर असे वाटते की आपण काही विसरलो आहोत. फोनशिवाय तर अनेकांना चैनही पडत नाही. आपल्या रोजच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे.


मात्र तुम्हाला माहीत आहे का प्रमाणापेक्षा अधिक मोबाईल वापरणेही अतिशय धोकादायक आहे. यामुळे आपल्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात नकारात्मक परिणाम होत आहेत. तर दररोज किती तास मोबाईल वापरला पाहिजे हे जाणून घ्या...



मुलांसाठी तसेच किशोरावस्थेतील मुलांसाठी


तज्ञांच्या म्हणण्यानुसार मुले तसेच किशोरवयीन मुलांनी दिवसातून २ तासांपेक्षा अधिक मोबाईलचा वापर करू नये. जास्त फोन पाहिल्याने त्यांच्या डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो. तसेच त्यांची झोपही खराब होऊ शकते. याशिवाय त्यांच्या शारिरीक विकासावरही परिणाम होतो.



वयस्कर लोकांसाठी


वयस्कर लोकांनी दिवसांतून ३ ते ४ तास मोबाईल वापरणे हे योग्य मानले जाते. दरम्यान ही वेळ काम आणि त्यांच्या गरजानुसार बदलू शकते. जर दिवसभर तुमचे काम फोन तसेच कम्प्युटरवर असेल तर मध्ये मध्ये ब्रेक घेतला पाहिजे. डोळ्यांना आराम दिला पाहिजे. जास्त फोनच्या वापरामुळे डोळ्यांना थकवा, डोकेदुखी तसेच तणाव येऊ शकतो.



वयोवृद्धांसाठी


वयोवृद्ध लोकांनी फोनचा वापर मर्यादित केला पाहिजे. खासकरून ज्यांना डोळ्यासंबंधित आजार आहेत. त्यांनी दिवसांतून एक ते दोन तास वापर करणे ठीक असू शकते.

Comments
Add Comment

मुंबईत काही अपवाद वगळता शांततेत मतदान

तब्बल १ हजार ७०० उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार मुंबई : मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका