Tuesday, May 13, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Accident news : धक्कादायक! कोयना एक्स्प्रेसखाली चिरडून दोन महिलांसह चिमुकली ठार

Accident news : धक्कादायक! कोयना एक्स्प्रेसखाली चिरडून दोन महिलांसह चिमुकली ठार

पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने येत होती एक्स्प्रेस


मुंबई : कोल्हापुरातून अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापुरात कोयना एक्स्प्रेसने तिघांना चिरडलं. मुंबईतून कोल्हापूरच्या दिशेने येणाऱ्या कोयना एक्स्प्रेसखाली सापडून दोन महिलांसह लहान मुलीचा जागीच मृत्यू झाला. काल रात्री उशिरा ही घटना घडली. दरम्यान, हा अपघात आहे की आत्महत्या याबाबत आता शाहूपुरी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.


रुळावरून चालत येत असताना ही दुर्देवी घटना घडल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अपघातात रात्री उशिरापर्यंत मृतांची ओळख पटली नाही. काल रात्रीच्या सुमारास या दोन महिला आणि लहान मुलगी कुठे चालल्या होत्या, याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. कोल्हापुरातील दुर्देवी घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment