Tuesday, April 29, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

Yummo ice cream : कापलेलं बोट आढळलेल्या आईस्क्रिमप्रकरणी धक्कादायक माहिती समोर!

Yummo ice cream : कापलेलं बोट आढळलेल्या आईस्क्रिमप्रकरणी धक्कादायक माहिती समोर!

यम्मो कंपनीने घडल्या प्रकारावर दिली प्रतिक्रिया

मुंबई : मुंबईच्या मालाडमधून (Mumbai crime) ऑनलाईन ऑर्डरप्रकरणी (Online order) एक अत्यंत धक्कादायक घटना काल समोर आली होती. ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रिमच्या कोनमध्ये (Ice cream cone) चक्क माणसाच्या तुटलेल्या बोटाचा तुकडा (Human finger) आढळल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी आता नवी अपडेट समोर आली आहे. मागवलेले आईस्क्रिम हे गाझियाबादच्या यम्मो कंपनीचे (Yummo company) असून घडल्या प्रकाराबाबत कंपनीने प्रतिक्रिया दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आईस्क्रिमची मॅन्युफॅक्चरिंग डेट (Manufacturing date) ११ मे २०२४ आहे आणि एक्झपायरी डेट (Expiry date) १० मे २०२५ आहे. आईस्क्रिमचं उत्पादन लक्ष्मी आईस्क्रिम प्रायव्हेट लिमिटेड गाझियाबाद येथे झालं आहे. यम्मो आईस्क्रिम ब्रँड विरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे आईस्क्रिम कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात आयपीसी कलम २७२ (उत्पादनामध्ये भेसळ करणे), कलम २७३ (धोकादायक खाद्य आणि पेय विक्री) आणि कलम ३३६ (दुसऱ्यांचे आयुष्य धोक्यात टाकणे) याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

तर या प्रकरणी यम्मो कंपनीकडून सांगण्यात आलं की, 'आम्ही हे उत्पादन थर्ड पार्टीकडून घेतलं आहे. त्यांचे उत्पादन थांबवण्यात आले आहे. शिवाय मार्केटमध्ये गेलेले उत्पादन देखील परत बोलावण्यात आले आहे. याप्रकरणी आम्ही तपास करत असून संबंधित प्रशासनाला पूर्ण सहकार्य केले जाईल'.

नेमकं काय घडलं?

मालाडमध्ये राहणार्‍या २६ वर्षांच्या एमबीबीएस डॉक्टर ब्रेंडन फेराओ याने आपल्या बहिणीसाठी झेप्टो अॅपवरुन तीन Yummo Mango आईस्क्रिम ऑनलाईन ऑर्डर केले होते. जेव्हा डिलिव्हरी झाली तेव्हा त्याला दोन मँगो फ्लेवर आणि एक बटरस्कॉच आईस्क्रिम मिळाले. बटरस्कॉच आईस्क्रिम खाताना त्याला त्यात काहीतरी कठीण आढळलं. त्याने ते हातानं काढून पाहिल्यास त्याला मानवाचं बोट आढळून आलं. यामुळे त्याला चांगलाच धक्का बसला.

फेराओ याने आईस्क्रिम आणि मानवाचं बोट घेऊन मालाड पोलीस स्टेशन गाठलं अन् तेथे तक्रार दाखल केली. पोलिसांनी माणसाचं बोट फॉरेन्सिक लॅबोरेटरीमध्ये पाठवलं आहे. फेराओने याप्रकरणी यम्मो आईस्क्रिम कंपनीकडेही तक्रार देखील केली आहे. कस्टमर केअर या प्रकरणी तपासणी करत असल्याचं त्याला सांगण्यात आलं आहे.

Comments
Add Comment