Saturday, May 10, 2025

क्रीडाताज्या घडामोडी

T20 World Cup: ५ संघ सुपर ८मध्ये दाखल, ८ झाले बाहेर, पाकिस्तान-इंग्लंड यांचे गणित बिघडले

T20 World Cup: ५ संघ सुपर ८मध्ये दाखल, ८ झाले बाहेर, पाकिस्तान-इंग्लंड यांचे गणित बिघडले

मुंबई: टी-२० वर्ल्ड कप(t-20 world cup 2024) आता सध्या अशा वळणावर आला आहे जिथे प्रत्येक सामन्यागणिक सुपर ८चे समीकरण बदलत आहेत. स्पर्धेत १४ जूनला दोन सामने झाले आणि त्यातून २ संघाच्या नशिबाचा फैसला झाला. अफगाणिस्तानने ग्रुप सीमध्ये पापुआ न्यू गिनीला हरवत पुढील राऊंडचे तिकीट मिळवले तर इंग्लंडने ग्रुप बीमध्ये ओमानला हरवत आपल्या आशा मजबूत केल्या आहेत. १४ जूनला अमेरिका आणि आयर्लंड यांच्यातील निर्णयाक सामना रंग आहे.


टी-२० वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत ५ संघ सुपर ८मध्ये खेळणे निश्चित झाले आहे. यात भारत (ग्रुप ए), ऑस्ट्रेलिया(ग्रुप बी), वेस्ट इंडिज(ग्रुप सी), अफगाणिस्तान(ग्रुप सी) आणि दक्षिण आफ्रिका(ग्रुप डी)मध्ये सामील आहे. आता ७ संघांमध्ये सुपर ८च्या बाकी ३ जागांसाठी लढत रंगणार आहे. स्पर्धेत ८ संघ सुपर ८च्या शर्यतीतून बाहेर झाले आहेत. यात न्यूझीलंड, श्रीलंका, आयर्लंड, नेपाळ, ओमान, नामिबिया, पापुआ न्यू गिनी, युगांडा या देशांचा समावेश आहे.


यावरून स्पष्ट आहे की वर्ल्डकपमध्ये पुढील दोन ते तीन दिवस सामने अतिशय रोमहर्षक होणार आहेत. खासकरून, अमेरिका, पाकिस्तान, स्कॉटलंड, इंग्लंड, बांगलादेश या देशांच्या चाहत्यांच्या नजरा आपल्या पसमतीच्या संघांवर असणार आहे.


१४ जूनचा सामना अमेरिका आणि आयर्लंड यांच्यात रंगणार आहे. मात्र यात पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांच्या नजरा असणार आहेत. जर या सामन्यात अमेरिका जिंकली अथवा पावसामुळे अंक विभागले गेले तर पाकिस्तानचा प्रवास संपेल. भले त्यांचा एक सामना जरी शिल्लक असला तरी ते सुपर८मधून बाहेर पडतील

Comments
Add Comment