
मुंबई: लिची स्वाद आणि आरोग्यासाठी फायदेशीर असते. स्वत:ला ताजेतवाने ठेवण्यासाठी लोक लिची खातात. काही फळे अशी असतात जी त्याच हंगामात मिळतात. जसे आंबे, लिची ही उन्हाळ्यातच मिळतात. त्यामुळे या फळांना अधिक पसंती असते.
लिची हे हंगामी फळ आहे. ते ज्या हंगामात येते त्यावेळेस लोक त्याला पसंती देतात. लिचीमध्ये अनेक पोषकतत्वे असतात. सोबतच यात मोठ्या प्रमाणात व्हिटामिन्सही असतात.
पाचनशक्ती सुधारण्यासाठी तुम्ही लिची खाऊ शकता. कारण यामुळे कार्डिओ व्हस्क्युलर आरोग्य सुधारण्यास मगत होते. तसेच कॅन्सरचा धोकाही कमी होतो.
लिची खाल्ल्याने इन्फेक्शनचा धोका कमी होतो. सोबतच गळ्यात होणाी खवखव, ताप, सर्दी या समस्येपासून सुटका मिळते. प्रेग्नंट महिलांसाठीही खूप फायदेशीर आहे.
लिचीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्यन असते. सोबतच यात व्हिटामिन सी मोठ्या प्रमाणात असते. हे खाल्ल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते. इन्फेक्शनसारख्या घातक आजारांशी लढण्यास मदत होते.