T-20 world cup 2024: भारताच्या विजयाने पाकिस्तानला झाला आनंद

मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने धमाकेदार कामगिरी केली आणि टी-२० वर्ल्डकप २०२४च्या(t-20 world cup 2024) सुपर ८मध्ये प्रवेश केला आहे. बुधवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारतीय संघाने अमेरिकेच्या संघाला ७ विकेटनी हरवले. हा भारताचा सलग तिसरा विजय आहे.


टी-२० वर्ल्डकप २०२४चे यजमानपद अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होत आहे. भारताचा हा सामना न्यूयॉर्कच्या नसाऊ काऊंटी स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. यात टॉस हरल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना अमेरिकेने १११ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात भारताने हे आव्हान ३ विकेट गमावताना पूर्ण केले आणि सामना आपल्या नावे केला.



भारताच्या विजयाने पाकिस्तान खुश


कठीण परिस्थितीत अडकलेला पाकिस्तानचा संघ या सामन्यात भारताच्या विजयासाठीच प्रार्थना करत होता. पाकिस्तानला जर सुपर ८ला क्वालिफाय करायचे असेल तर त्याला उरलेला सामना जिंकावा लागेल. सोबतच अमेरिकेने उरलेला सामना गमवावा अशी प्रार्थना करावी लागेल.


ग्रुप एमध्ये भारतीय संघ ६ गुणांसह अव्वल स्थानावर आहे तर दुसऱ्या स्थानावर अमेरिका आहे. त्यांचे ४ गुण आहेत. भारताच्या विजयाने पाकिस्तानच्या आशा उंचावल्या आहेत.

Comments
Add Comment

ICC ODI Rankings: कोहलीचा अव्वल सिंहासनावरून पायउतार, डॅरिल मिशेल नंबर-वन

ICC ODI Rankings : आयसीसी वनडे क्रमवारीत मोठा आणि मनाला वेदना देणारा बदल पाहायला मिळाला असून भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी

ड्रीम-११ आणि माय-११ नंतर गुगलचा बीसीसीआयला आधार

मुंबई : बीसीसीआय पूर्वी ऑनलाइन गेमिंग कंपन्यांकडून भरपूर उत्पन्न मिळवत होते. मात्र आता अशावेळी बोर्ड हे नुकसान

बॅडमिंटनपटू सायना नेहवालची निवृत्ती

गुडघ्याच्या दुखापतीने कारकिर्दीला पूर्णविराम मुंबई : भारतीय बॅडमिंटनला जागतिक नकाशावर मानाचे स्थान मिळवून

‘ए+’ श्रेणीतून विराट, रोहित, बुमराहला डच्चू?

बीसीसीआयच्या करारात ट्विस्ट : मानधनात कपात होण्याची शक्यता नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर

विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची परीक्षा

नागपुरात आज न्यूझीलंडविरुद्ध पहिली टी-२० लढत ; पांड्या, बुमराह, श्रेयसवर लक्ष नागपूर : न्यूझीलंडविरुद्धच्या

कर्णधार सूर्यकुमार यादव गाठणार ‘शतकी’ टप्पा

नागपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेचा थरार बुधवारपासून नागपूरच्या विदर्भ