Tuesday, April 22, 2025
HomeदेशLoksabha: लोकसभा सभापतीपदासाठी २६ जूनला होणार निवडणूक

Loksabha: लोकसभा सभापतीपदासाठी २६ जूनला होणार निवडणूक

नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक २०२४(loksabha election 2024) संपल्यानंतर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनले. रविवारी शपथ घेतल्यानंतर सोमवारी सर्व मंत्र्यांना मंत्रिमंडळाचे वाटप करण्यात आले आणि सरकारने आपले काम सुरू केले आहे. आता सर्व लोकांच्या नजरा लोकसभा सभापतीच्या निवडणुकीवर होत्या. याबाबत राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी नोटिफिकेशन जारी केले आहे. ही निवडणूक २६ जूनला होणार आहे.

२७ तारखेला संसदेच्या दोन्ही सदनांना राष्ट्रपती संबोधित करतील. या दिवशी सकाळी ११ वाजता राष्ट्रपतींचे अभिभाषण होईल. म्हणजेच आधी सर्व नवनिर्वाचित लोकसभा खासदारांना शपथ देण्यासोबतच नव्या सभापतींची निवड होईल. २४ आणि २५ जूनला प्रोटेम स्पीकर नव्या खासदारांना शपथ देतील.

कोणाकडे राहणार लोकसभा सभापती पद?

लोकसभा सभापती पद भारतीय जनता पक्ष आपल्याकडेच ठेवत आहे. म्हणजेच१८व्या लोकसभेत भाजपचेच कोणीतरी खासदार लोकसभा सभापती म्हणून निवडले जाणार आहेत.

२४ जूनला सुरू होणार संसदेचे अधिवेशन

सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशी दौऱ्यावर परतल्यानंतर लोकसभेच्या नवया सभापतींच्या नावावर विचार-विनिमय करतील. भाजप आधी पक्ष स्तरावर लोकसभेच्या भावी सभापतींचे नाव ठरवतील त्यानंतर सहकारी पक्षासोबत विचार-विनिमय केला जाईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -