Mumbai crime : धक्कादायक! ऑनलाईन ऑर्डर केलेल्या आईस्क्रिममध्ये आढळलं माणसाचं तुटलेलं बोट!

मुंबईच्या मालाडमधील खळबळजनक घटना


मुंबई : ऑनलाईन ऑर्डर (Online order) केलेल्या पदार्थांमध्ये भेसळ असणे, किंवा काहीतरी चूक असणे यात आता काही नवीन राहिलं नाही. अशा अनेक तक्रारी येत असतात. मात्र, मुंबईच्या मालाडमधून (Mumbai crime) याच ऑनलाईन ऑर्डरप्रकरणी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रिमच्या कोनमध्ये (Ice cream cone) चक्क माणसाच्या तुटलेल्या बोटाचा तुकडा आढळला. यामुळे खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, ऑर्लेम ब्रेंडेन सेराओ (वय २७) या नावाच्या व्यक्तीने काल १२ जूनला ऑनलाइन डिलिव्हरी अॅपद्वारे आइस्क्रिमची ऑर्डर दिली होती. त्याने आईस्क्रिमचे तीन कोन मागवले होते. त्यापैकी एका आईस्क्रीममध्ये कापलेलं बोट आढळून आलं. या व्यक्तीने यम्मो कंपनीचं (EMOI) बटस्कॉच फ्लेव्हरचे आईस्क्रिम मागवले होते. त्याने आईस्क्रीमच्या बॉक्सचे झाकण उघडताच त्याला बोट दिसले. त्यानं हे बोट बाहेर काढले. जवळपास २ सेमी लांबीच्या बोटाचा तुकडा दिसला. या घटनेमुळे ऑनलाईन कोणतीही गोष्ट मागवणे आता असुरक्षित असल्याचे बोलले जात आहे.


ऑर्लेम ब्रेंडन सेराओ हे एमबीबीएस डॉक्टर (MBBS doctor) आहेत. त्यामुळे त्यांना आइस्क्रिममध्ये असलेले बोट माणसाचेच असल्याचे लगेच समजले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलीस याप्रकरणी तपासणी करत आहे. आईस्क्रीममध्ये आढळलेल्या बोटाचा तुकडा प्रयोगशाळेत तपासासाठी पाठवण्यात आला आहे. हे आईस्क्रीम कुठे बनवले जाते, कुठे पॅक केले जाते, याबाबत शोध घेतला जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment

Blue Flag Beach : श्रीवर्धन समुद्रकिनारा ‘ब्लू फ्लॅग बीच’ म्हणून विकसित होणार

मुंबई : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याचा शाश्वत विकास साधत त्याला ‘ब्लू फ्लॅग बीच’ म्हणून विकसित

Maharashtra : गोदा ते नर्मदा या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६ उपक्रमाचा शुभारंभ त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून होणार

मुंबई : "गोदा ते नर्मदा" या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६ चा शुभारंभ त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून

Maharashtra : उदंचन जलविद्युत प्रकल्पाद्वारे ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्र अग्रेसर ठरणार

मुंबई : राज्यातील वीज निर्मितीची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येणार येत उदंचन जलविद्युत प्रकल्पातून एक

Heat Wave : उष्णता लाटेच्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी राज्य शासन सज्ज

मुंबई  : वातावरणीय बदलांमुळे राज्यात हवामानात मोठे आणि अनियमित बदल दिसून येत आहेत. मे महिन्यात पाऊस, एप्रिलमध्ये

Reservation : अनुसूचित जाती उपवर्गीकरणाबाबत निवेदन देण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या अनुषंगाने निवेदन किंवा अर्ज सादर करण्यासाठी

Nitesh Rane : मत्स्य शेतकऱ्यांच्या उत्पादनांसाठी राज्यात 'क्लस्टर', मूल्यवर्धनासाठी कारखाना उभारण्यावरही चर्चा

मुंबई : राज्यातील मत्स्यव्यवसायाला आधुनिक उद्योगाची जोड देण्यासाठी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे