Karan Johar : नावाचा गैरवापर केल्याप्रकरणी करण जोहरची न्यायालयात धाव!

नेमकं काय घडलं?


मुंबई : काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) याने त्याची ओळख असलेला शब्द 'भिडू' हा गैरपद्धतीने वापरल्याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर आता प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक व निर्माता करण जोहर (Karan Johar) याने अशाच एका प्रकरणी न्यायालयात धाव घेतली आहे. त्याच्या नावाचा एका चित्रपटाच्या शीर्षकात चुकीचा वापर केल्याचा आरोप करत त्याने मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High court) दाद मागितली आहे. ‘शादी के डायरेक्टर करण और जोहर’ या चित्रपटावर करणने बंदी घालण्याची मागणी केली आहे.


‘शादी के डायरेक्टर करण और जोहर’ हा चित्रपट १४ जून रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा निर्माता इंडिया प्राइड ॲडव्हायझरी आणि संजय सिंग आणि लेखक-दिग्दर्शक बबलू सिंग यांच्याविरोधात करणने डीएसके लीगलच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. करणने आपल्या याचिकेत असं लिहिलं आहे की, चित्रपटाच्या नावावरून त्याची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांना त्याचे नाव वापरण्यापासून रोखले पाहिजे, असं करणचं म्हणणं आहे.


खटल्यात करणने दावा केला की, 'जे चित्रपटाच्या शीर्षकामध्ये बेकायदेशीरपणे माझं नाव वापरत आहेत, तो चित्रपट आणि त्याच्या निर्मात्यांशी माझा कोणताही संबंध नाही. चित्रपटाच्या शीर्षकात माझं नाव थेट नमूद केलं आहे, यामुळे माझे व्यक्तिमत्त्व हक्क, प्रसिद्धी आणि गोपनीयतेच्या अधिकारांचं उल्लंघन होत आहे. माझ्या ‘ब्रँड नेम’चा गैरवापर करून निर्माते माझ्या प्रतिष्ठेचा गैरफायदा घेत आहेत, जे कायदेशीररित्या योग्य नाही.' करणने फिर्यादीत म्हटलं आहे की, हा चित्रपट १४ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे आणि या चित्रपटाचा ट्रेलर आणि त्याचे पोस्टर्स सार्वजनिकरित्या आणि सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहेत. या ट्रेलर आणि पोस्टर्समुळे करणच्या प्रतिष्ठेला निर्माते नुकसान पोहोचवत आहेत.


या चित्रपटाच्या प्रदर्शनावर तात्काळ बंदी घालण्यासाठी काल न्यायमूर्ती आर. आय. छागला यांच्या खंडपीठासमोर खटला सादर करण्यात आला. खंडपीठाने त्यास मान्यता दिली असून तातडीने दिलासा मिळावा यासाठी याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. ‘शादी के डायरेक्टर करण और जोहर’ हा एक कमी बजेटचा चित्रपट आहे, ज्यामध्ये अमन सिंग दीप, पार्थ आकेरकर, मोनिका राठोड, अमित लेखवानी मुख्य भूमिकेत आहेत.

Comments
Add Comment

BJP Yuva Morcha : ‘वंदे मातरम्’च्या अवमानाच्या निषेधार्थ भाजयुमो मुंबईचे जोरदार आंदोलन

मुंबई : १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी

Maharashtra New Doctors Appointed : राज्यात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

- आरोग्यमंत्र्यांनी साधला सहा लाखाहून अधिक नागरिकांची जनसंवाद मुंबई : राज्यात उपलब्ध झालेल्या १,४४० डॉक्टरांची

Prakash Abitkar : आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे

Mumbai Family Suicide : नेव्ही नगरमध्ये नौदल कर्मचाऱ्याची कुटुंबासह राहत्या घरात आत्महत्या; पोलिसांकडून तपास सुरू

मुंबई : कुलाबा येथील नेव्ही नगर परिसरात नौदल कर्मचाऱ्यासह त्याची पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाल्याची