India vs USA: आज भारतीय संघ पोहोचणार टी-२० वर्ल्डकपच्या सुपर८मध्ये? USAशी सामना

  112

मुंबई: अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्या यजमापदाखाली खेळवल्या जात असलेल्या टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये आज भारतीय संघाचा सामना यूएसएशी खेळवला जात आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होणार आहे. न्यूयॉर्कच्या नसाऊ काऊंटी स्टेडियममध्ये हा सामना रंगणार आहे.


या सामन्यात जो संघ विजयी होईल तो संघ सुपर ८ साठी क्वालिफाय करेल. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ विजयासाठी अधिक दावेदार मानला जात आहे. दुसरीकडे कठीण परिस्थितीत असलेला पाकिस्तानचा संघही भारताच्या विजयासाठी प्रार्थना करेल.


पाकिस्तानला जर सुपर ८ साठी क्वालिफाय करायचे असेल तर त्याला शेवटचा सामना जिंकणे गरजेचे आहे. सोबतच यूएसएनेही त्यांचे दोन सामने गमवावेत अशी प्रार्थना करावी लागेल. सध्या ग्रुप एमध्ये भारतीय संघ आणि यूएसएचे २-२ अंक आहेत. भारत अव्वल स्थानावर आहे.



अमेरिकाला कमकुवत समजणे चूक ठरेल


भारतीय संघाची टॉप ऑर्डर अमेरिकेविरुद्ध चांगली कामगिरी करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. अमेरिकेच्या संघाकडे जरी अनुभव नसला तरी गेल्या २ सामन्यांत त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांना कमी लेखून चालणार नाही.



संघ


भारतीय संघ - रोहित शर्मा(कर्णधार), हार्दिक पांड्या, यशस्वी जायसवाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.


अमेरिकेचा संघ - मोनांक पटेल(कर्णधार), आरोन जोन्स, अँड्रीज गौस, कोरी अँडरसन, अली खान, हरमीत सिंह, जेसी सिंह, मिलिंद कुमार, निसर्ग पटेल, नितीश कुमार, नोशतुश केंजीगे, सौरभ नेत्रावलकर, शॅडली वान शल्कविक, स्टीव्हन टेलर आणि शायन जहांगीर

Comments
Add Comment

हॉकी एशिया कप खेळण्यासाठी पाकिस्तानचा संघ भारतात येणार ?

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील गेल्या काही महिन्यांपासून तणावाच्या पार्श्वभूमीवर क्रीडा मंत्रालयातील

ENG vs IND: शुभमन गिलने द्विशतक ठोकत रचला इतिहास, कोहलीचा रेकॉर्ड मोडला

एजबेस्टन: इंग्लंडविरुद्ध एजबेस्टन कसोटीत कर्णधार शुभमन गिलचा जलवा पाहायला मिळत आहे. शुभमन गिलने भारताच्या

ENG vs IND: शुभमन गिलचे शतक, पहिल्या दिवशी भारत तीनशेपार

एजबेस्टन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून एजबेस्टनच्या मैदानावर खेळवला जात आहे. या

UAE मध्ये आशिया चषक क्रिकेट स्पर्धा

अबुधाबी : आशिया चषक क्रिकेट स्पर्धा संयुक्त अरब अमिराती अर्थात यूएई येथे होणार असल्याचे वृत्त आहे. आशियाई

Ind vs Eng: भारत वि इंग्लंड दुसऱ्या कसोटीला आजपासून सुरूवात

मुंबई: कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत

Mohammad Shami: कोलकाता उच्च न्यायालयाकडून मोहम्मद शमीला मोठा झटका

नवी दिल्ली: कोलकाता उच्च न्यायालयाकडून क्रिकेटर मोहम्मद शमीला मोठा झटका बसला आहे. उच्च न्यायालयाने शमीला त्याची