IND vs USA: यूएसएविरुद्धच्या सामन्यात भारताचा ७ विकेट राखून विजय, सुपर ८मध्ये प्रवेश

न्यूयॉर्क: टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये(t-20 world cup 2024) भारत आणि यूएसए यांच्यात रंगलेल्या सामन्यात भारताने अखेर बाजी मारली. यूएसएने विजयासाठी दिलेले १११ धावांचे आव्हान भारताने ७ विकेट राखत पूर्ण केले. भारताच्या विजयाची ही हॅटट्रिक आहे. भारताने यासोबतच टी-२० वर्ल्डकपच्या सुपर ८मध्ये प्रवेश केला आहे.


भारताच्या विजयाचे हिरो ठरले सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे. भारताची आघाडीची फळी अपयशी ठरल्यानंतर ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादव यांनी आधी भार सांभाळला. त्यानंतर पंत १८ धावांवर बाद झाला. यानंतर सूर्यकुमार यादवने शिवम दुबेला सोबत घेतले आणि भारताला विजय गाठून दिला.


सूर्यकुमार यादवने या सामन्यात अर्धशतक ठोकत भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले. यादवने नाबाद ५० धावा ठोकल्या. दुसरीकडे गोलंदाजीत शिवम दुबे जरी चालला नसला तरी त्याने फलंदाजीतून दाखवून दिले की तो ही काही कमी नाही. त्याने नाबाद ३१ धावा केल्या. यूएसएने भारताला विजयासाठी संघर्ष करायला लावला.


खरंतर १११ धावांचे आव्हान भारतासाठी काही मोठे नव्हते. मात्र असे असतानाही नवख्या यूएसए संघाने भारताला संघर्ष करायला लावला. यूएसएकडून सौरभ नेत्रावलकरने २ विकेट घेतल्या.


टी-२० वर्ल्डकपमधील भारताचा हा सलग तिसरा विजय आहे. पहिला विजय त्यांनी आयर्लंडविरुद्ध मिळवला होता. त्यानंतर भारताने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला हरवले. त्यानंतर आता तिसरा विजय यूएसएविरुद्ध मिळवला आहे.

Comments
Add Comment

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.

IND vs WI: भारताने ४४८वर पहिला डाव केला घोषित, २८६ धावांची घेतली आघाडी

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला तिसऱ्या दिवशी नाट्यमय

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ध्रुव जुरेलचं पहिलं शतक! 'गन सॅल्यूट' करत केले सेलिब्रेशन

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताची घट्ट पकड, राहुल, जुरेल आणि जडेजाने ठोकले शतक

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी वेस्ट

IND vs WI: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, पहिल्याच दिवशी विंडीजचा संपूर्ण डाव कोसळला

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र