Wednesday, September 17, 2025

चंद्राबाबूनी स्विकारली चौथ्यांदा आंध्रच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा

चंद्राबाबूनी स्विकारली चौथ्यांदा आंध्रच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी बुधवारी चंद्राबाबू नायडू शपथबद्ध झाले. राज्यपाल एस. अब्दुल नजीर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुख्यमंत्री म्हणून नायडू यांनी चौथ्यांदा शपथ घेतली.

शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, जेपी नड्डा, नितीन गडकरी, रामदास आठवले, अनुप्रिया पटेल आणि चिराग पासवान यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, अभिनेते रजनीकांत, चिरंजीवी यांची प्रमुख उपस्थिती होती.

शपथविधी सोहळ्यात अभिनेते आणि जनसेना प्रमुख पवन कल्याण, तेलुगू देसम पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस नारा लोकेश यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.

मंत्र्यांच्या यादीत जनसेना पक्षाच्या तीन आणि भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) एका मंत्र्यांचा समावेश आहे.

कोलू रवींद्र, नादेंडला मनोहर, पी नारायण, वंगालपुडी अनिता, सत्यकुमार यादव, निर्मला रामनायडू, एनएमडी फारुक, अनामिक रामनारायण रेड्डी, पय्यावुला केशव, अज्ञानी सत्यप्रसाद, कोळसू पार्थसाराधी, बलवीरंजनेयस्वामी, गोटीपती रवी, कांडला दुर्गेश, गुम्मदी संध्याराणी, जनार्दन रेड्डी, टीजी भरत, एस सविता, वासमशेट्टी सुभाष, कोंडापल्ली श्रीनिवास, मंडीपल्ली राम प्रसाद रेड्डी, अचन्नायडू यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

Comments
Add Comment