Airoli News : ऐरोलीत रेल्वेने लावलेली लोखंडी कमान कोसळली

नवी मुंबई : ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावरील ऐरोली सेक्टर-३ येथे रेल्वे प्रशासनाने उभारलेली लोखंडी कमान कोसळल्याची घटना घडली. यात कोणतीही हानी झाली नाही. कोसळलेली कमान हटविण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले.


ठाणे - वाशी रेल्वे मार्गावर ऐरोली सेक्टर-३ येथे रेल्वे लाईन खाली जड वाहतुकीसाठी रेल्वे प्रशासनाने लोखंडी कमान उभी केली होती. ठाणे-बेलापूर मार्गावरून ऐरोली सेक्टर ३ कडे जाण्यासाठी रेल्वे अंडरपास वापर केला जातो. सदर अंडरपास शेजारी एमएमआरडीएकडून विक्रोळी शीळ उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू आहे. उड्डाण पुलाच्या बांधकामामुळे सदर रेल्वे प्रशासनाने उभारलेली कमान मंगळवारी दुपारी १२च्या दरम्यान अचानक कोसळली. या दुर्घटनेत कोणतीही जीवित व वित्त हानी झाली नाही.


कमान पडण्याचे समजताच रेल्वे प्रशासनाची टीम घटनास्थळी पोहोचून कमान हटविण्यात आली. या घटनेने काही वेळ खळबळ उडाली होती.

Comments
Add Comment

देशामध्ये २२ बनावट विद्यापीठे

‘यूजीसी’ने जाहीर केली यादी मुंबई  : मान्यता नसलेल्या विद्यापीठांमुळे दरवर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व

आरटीओ कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण अटळ

मुंबई : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आकृतीबंधाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करावी. सर्व रिक्त पदांवर

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

'आयुष'च्या ४२८५ रिक्त जागा, होमिओपथी, आयुर्वेद, युनानी अभ्यासक्रमांचे प्रवेश

महाराष्ट्र : आरोग्यविज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सरकारी आणि खासगी महाविद्यालयांकडून राबवण्यात

शिक्षक होण्याची सुवर्णसंधी, CTETची अधिसूचना जाहीर

मुंबई : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार केंद्रीय शिक्षक पात्रता