Instagram New Feature : इन्स्टाग्रामचे नवीन फीचर लॉन्च! ब्रँड्सचा फायदा पण यूजर्स नाराज

मुंबई : व्हॉट्सअ‍ॅप (Whatsapp), फेसबुक (Facebook) आणि इन्स्टाग्रामवर (Instagram) सातत्याने नवनवीन फीचर्स (New Features) येत असतात. या सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्म्सवरील विविध फीचर्स हे नेहमीच यूजर्सच्या दृष्टिकोनातून बनवले जातात. या तिन्ही प्लॅटफॉर्म्सची पॅरेंट कंपनी असलेल्या मेटाकडून हे फीचर्स सादर केले जातात. अशातच मेटाने (Meta) इन्स्टाग्रामवर एक नवे फीचर लॉन्च केले आहे. मात्र या फीचरमुळे यूजर्सकडून नाराजीचा सूर मारला जात आहे. जाणून घ्या नेमके काय आहे ते नवे फीचर.


यूट्यूब, फेसबुक, स्पॉटीफाय अशा अनेक ॲप्सवर स्क्रोल करताना किंवा गाणी ऐकताना स्किप न करता येणाऱ्या जाहिराती पाहाव्या लागतात. तर, यूट्यूब, फेसबुकवर काही जाहिराती आपण स्किपही करू शकतो. पण, काही ॲप्सवर जाहिराती स्किप करणे शक्य नसते. त्यामुळे स्क्रोल करताना थोडा वेळ थांबून ती जाहिरात जबरदस्तीने पाहावीच लागते. आता या ॲप्सच्या यादीत इन्स्टाग्राम ॲपचासुद्धा समावेश झाला आहे.


'या' नव्या फीचरचा समावेश


इन्स्टाग्राम सध्या ‘ॲड ब्रेक्स’ (ad breaks) नावाच्या नवीन फीचरची चाचणी करीत आहे. यामुळे वापरकर्त्यांना रील्स किंवा एखादी पोस्ट स्क्रोल करणे सुरू ठेवण्यापूर्वी विशिष्ट कालावधीसाठी जाहिरात पाहावी लागणार आहे. या जाहिरातींमुळे इन्स्टाग्रामला फायदाही होऊ शकतो आणि तोटाही होऊ शकतो. परंतु याचा अंतिम निर्णय अद्यापही कंपनीवर अवलंबून असेल, असे इन्स्टाग्रामचे स्पोक्स पर्सन मॅथ्यू टाय यांनी म्हटले.


इन्स्टाग्राम स्टोरी आणि पोस्ट स्क्रोल करताना यूजर्सना 'ॲड ब्रेक्स' फीचरचा सामना करावा लागणार आहे. म्हणजेच, यूजर्स स्क्रोल करत असताना इन्स्टाग्राम एक काउंटडाउन टायमर स्क्रीनवर दाखवणार आहे. हा टायमर संपेपर्यंत तुम्हाला स्किप न करता ही जाहिरात पाहावी लागणार आहे. त्यामुळे युजर्सना स्क्रोल करून पुढे जाणेही शक्य होणार नाही.


दरम्यान, एका युजरने या फीचरचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ज्यामध्ये टायमरसह 'ॲड ब्रेक' चिन्ह दिसत आहे. यूट्यूबप्रमाणे इन्स्टाग्रामवरही आता जाहिरात पाहावी लागणार असल्यामुळे यूजर्सकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Nepal's flood situation : नेपाळमधील पूरस्थितीवर पंतप्रधान मोदींची बालेन्द्र शाह यांच्याशी चर्चा, भारताकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

नवी दिल्ली : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

UP : उत्तरप्रदेशमध्ये आई-वडिलांशी दुर्व्यवहार करणारी मुले संपत्तीतून बेदखल होणार

लखनऊ : उत्तर प्रदेश (UP) सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे

DRDO Military Combat Parachute System test : लडाखमध्ये २२,००० फूट उंचीवरून स्वदेशी लष्करी लढाऊ पॅराशूट प्रणालीची चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने लडाखमधील जगातील सर्वात उंच ड्रॉप झोनपैकी एकावर आपल्या लष्करी लढाऊ पॅराशूट प्रणालीची

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी 27 ऑगस्ट रोजी 'खेलो इंडिया संवाद'मध्ये तरुणांना करणार संबोधित

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 'खेलो इंडिया

NSG in Ayodhya : अयोध्येत NSG चे सातवे प्रादेशिक केंद्र सप्टेंबरपासून सुरू होणार

अयोध्या : उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येत NSG चे (National Security Guard) सातवे प्रादेशिक केंद्र सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

105 indians missing nepal flood : नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार : १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता; मानसरोवर यात्रेकरूंचाही समावेश, बचावकार्य तीव्र

काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal Flood) आलेल्या भीषण महापुरामुळे प्रचंड प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली आहे. या नैसर्गिक