Raksha Khadse : माझ्या राजकीय प्रवासात नाथाभाऊंचा मोठा वाटा!

केंद्रात मंत्रीपद मिळाल्यानंतर एकनाथ खडसेंच्या सूनबाई रक्षा खडसे भावूक


आपल्या आयुष्यातील हा सर्वात मोठा आनंदाचा क्षण : एकनाथ खडसे


नवी दिल्ली : देशात एनडीए (NDA) तिसर्‍यांदा सत्तास्थापन करणार असून आज संध्याकाळी सव्वासात वाजता नव्या मंत्रिमंडळाचा (Cabinet) शपथविधी सोहळा (Oath taking ceremony) पार पडणार आहे. केंद्रीय मंत्रिपदासाठी (Union Ministers) महायुतीच्या (Mahayuti) कोणत्या खासदारांची वर्णी लागली आहे, याची माहिती देखील समोर आली आहे. यामध्ये उत्तर महाराष्ट्रातून भाजपच्या रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना संधी देण्यात आली आहे. ही लॉटरी लागल्यानंतर रक्षा खडसे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्या भावूक झाल्याचे दिसले.


रक्षा खडसे म्हणाल्या की, माझी राजकारणाची सुरुवातच एकनाथ खडसे यांच्यापासून झाली आहे. माझ्या राजकीय प्रवासात नाथाभाऊंचा मोठा वाटा आहे. माझ्या माहेरच्या लोकांचा राजकारणाशी कुठलाही संबंध नाही. सामाजिक कामाची आवड मला माझ्या वडिलांपासून मिळालेली आहे.


पुढे त्या म्हणाल्या, एका राजकीय घराण्यात मी सून म्हणून आले. नाथाभाऊ यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले. माझ्या आयुष्यातील बरीच परिस्थिती बदलत गेली. त्या परिस्थितीत नाथाभाऊंनी मला खूप साथ दिली आहे. तसेच पक्षाच्या नेत्यांसह सर्व जनतेने मला साथ दिली आहे. हा क्षण माझ्यासाठी अत्यंत मोठा आहे. इतकी मोठी संधी मला मिळत आहे, असे म्हणताना रक्षा खडसे भावूक झाल्या. मला कुठलीही अपेक्षा नाही. पक्ष जी जबाबदारी देईल ती जबाबदारी मी स्वीकारेल, असेही त्यांनी म्हटले.



सासरे एकनाथ खडसे काय म्हणाले?


एकनाथ खडसे म्हणाले की, रक्षा खडसे यांना मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी दिल्लीला बोलवले हा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण आहे. रक्षा खडसे यांनी अनेक वर्ष केलेल्या श्रमाचे हे फळ आहे. त्याचबरोबर जनतेचे त्यांच्या पाठीशी असलेले आशीर्वाद यामुळे हे शक्य झाले आहे. देशाच्या बरोबर आपल्या भागासाठी रक्षाताई नक्की योगदान देतील, असा आपल्याला विश्वास आहे, असे एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी म्हटले. एकनाथ खडसे देखील आज दिल्लीमध्ये शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

Comments
Add Comment

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या