‘या’ चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला…
मुंबई : अमृता राव (Amrita Rao) ही बॉलिवूडमध्ये (Bollywood) मोजकेच चित्रपट केलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा शाहिद कपूरसोबतचा (Shahid Kapoor) विवाह चित्रपट फार गाजला. त्यानंतर ती जॉली एलएलबी सिनेमात अर्शद वारसीच्या (Arshad Warsi) गर्लफ्रेंडच्या भूमिकेत दिसली होती. सिनेसृष्टीत जास्त न दिसलेली ही अभिनेत्री पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर कमबॅक करण्यास सज्ज झाली आहे. हा चित्रपट म्हणजेच जॉली एलएलबीचाच तिसरा भाग असणार आहे. यात अमृता राव अर्शद वारसीच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.
सुभाष कपूर दिग्दर्शित ‘जॉली एलएलबी ३’ (Jolly LLB 3) या चित्रपटाचे सध्या शूटिंग सुरु आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागात अर्शद वारसी मुख्य भूमिकेत दिसला होता, तर दुसर्या भागात अक्षय कुमार (Akshay Kumar) मुख्य भूमिकेत होता. त्याच्या पत्नीची भूमिका हुमा कुरैशीने साकारली होती. पहिल्या दोन्ही भागांमध्ये सौरभ शुक्ला यांनी मुख्य न्यायाधीशाची भूमिका साकारली होती. विशेष बाब म्हणजे सिनेमाच्या तिसर्या भागात अर्शद वारसी व अक्षय कुमार हे दोन्ही अभिनेते एकत्र दिसणार आहेत. तर अर्शदच्या पत्नीची भूमिका अमृता राव करणार आहे.
‘जॉली एलएलबी’च्या तिसऱ्या भागाचं काही शुटींग राजस्थानमध्ये झालं आहे. हे शूटिंग राजस्थानमधील अत्यंत दुर्गम भागात झाले आहे. त्या ठिकाणच्या रस्त्यावरून एकही वाहन जाऊ शकत नसल्यामुळे तेथे जाण्यासाठी प्रत्येकाला चालत जावे लागत होते. आता शूटिंग मुंबईत होत आहे. यानंतर काही सीन दिल्लीत शूट होणार आहेत. परंतु अद्याप अमृताकडून या चित्रपटातील तिच्या भूमिकेबाबत कोणत्याही प्रकारचं भाष्य करण्यात आलेलं नाही.