Rahul Gandhi : विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधींच्या नावावर शिक्कामोर्तब!

काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत झाला निर्णय


नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) भाजपाने (BJP) सर्वाधिक २४० जागा जिंकत मोठा विजय मिळवला, तर काँग्रेस (Congress) ९९ जागा जिंकत विरोधी पक्ष ठरला. त्यामुळे भाजपप्रणित एनडीए (NDA) पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार यावर शिक्कामोर्तब झाले. एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची निवड करण्यात आल्याने मोदी सलग तिसर्‍यांदा देशाचे पंतप्रधान बनणार आहेत. एनडीएकडून वेगाने हालचाली सुरु असताना इंडिया आघाडीकडून (INDIA Alliance) मात्र अद्याप विरोधी पक्षनेत्याची घोषणा झाली नव्हती. आता काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत यावर निर्णय झाला असून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेते बनवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.


काँग्रेस कार्यकारिणीची विस्तारित बैठक पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि महासचिव प्रियांका गांधी, संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल आणि इतर सदस्य आणि कार्यकारिणीचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.


काँग्रेस पक्षाचे संघटनेचे प्रभारी सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी आज ही माहिती दिली. ते म्हणाले, 'काँग्रेस कार्यकारिणीने एकमताने राहुल गांधींना लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावण्याचे आवाहन केले. संसदेत या मोहिमेचे नेतृत्व करण्यासाठी राहुलजी योग्य व्यक्ती आहेत.'' वेणुगोपाल यांना विचारण्यात आले की, या प्रस्तावावर राहुल गांधींची प्रतिक्रिया काय होती? ते म्हणाले, 'यावर माजी राहुल गांधी यांनी आपण विचार करू, असे सांगितले आहे.'


काँग्रेस सीडब्लूसी बैठकीनंतर काँग्रेस नेते भूपिंदर सिंग हुड्डा यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 'राहुल गांधींना विरोधी पक्षनेते करावे. ही सर्वांची मागणी असून यातूनच काँग्रेस मजबूत होईल. बैठकीनंतर काँग्रेस नेते गौरव गोगोई म्हणाले, 'जेव्हाही काँग्रेस पक्षाला राहुल गांधींकडून काही अपेक्षा होत्या, तेव्हा त्यांनी पक्षाच्या इच्छा पूर्ण केल्या आहेत. आज काँग्रेस पक्ष त्यांना देशाचा आवाज सभागृहात बुलंद करण्याची विनंती करतो. यातच काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की, राहुल गांधींनी विरोधी पक्षनेते व्हावे, असे सर्वांचे म्हणणे असून हेच व्हायला हवे. त्यामुळे काँग्रेसकडून राहुल गांधींच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून आता राहुल गांधी काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जयघोष निनादणार

गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक' चित्ररथ सज्ज नवी दिल्ली: भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या

आयडब्ल्यूडीसी ३.०' अंतर्देशीय जलमार्ग विकासाला नवी दिशा देणार

कोची : अंतर्देशीय जल वाहतूक (आयडब्ल्युटी) क्षेत्रातील यशावर प्रकाश टाकण्यासाठी आणि भविष्यातील दृष्टिकोन

कोळंबी उत्पादन आणि मत्स्यव्यवसाय विकासासाठी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक संपन्न

महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती नवी दिल्ली: देशातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा कायापालट

जम्मू काश्मीर : डोडा जिल्ह्यात लष्करी वाहनाला अपघात, १० जवानांचा मृत्यू

डोडा : जम्मू काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात लष्करी वाहन जरीत कोसळले. या अपघातात दहा जवानांचा मृत्यू झाला. तसेच अकरा

Vaishno Devi Dham : आता रात्रीही घेता येणार माता वैष्णोदेवीच्या प्राचीन गुहेचे दर्शन, वाचा नवीन वेळापत्रक

कटरा : माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या लाखो भाविकांसाठी श्राईन बोर्डाने एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय

चकमकीत ठार झाला एक कोटींचे बक्षीस लावलेला नक्षलवादी अनल दा, इतर १४ नक्षलवादीही ठार

रांची : गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीआधारे सापळा रचून झारखंड पोलिसांनी सारंडाच्या घनदाट जंगलात अनेक