Narendra Modi : गेल्या दहा वर्षांत तर नाहीच पण पुढच्या दहा वर्षांतही काँग्रेस १०० चा आकडा गाठणार नाही!

पंतप्रधानपदाची शपथ घेण्यापूर्वी नरेंद्र मोदींचा इंडिया आघाडीवर तुफान हल्लाबोल


नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतील जुन्या संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये एनडीएच्या (NDA) सर्व नवनिर्वाचित खासदारांची तसेच घटक पक्षांच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची एकमताने एनडीएच्या नेतेपदी निवड करण्यात आली असून रविवारी ९ जूनला संध्याकाळी ६ वाजता नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या बैठकीत सर्व घटकपक्षांच्या प्रमुख नेत्यांची भाषणे झाली. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही लांबलचक भाषण करत, घटकपक्षांचे आभार मानले. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीवरही (INDIA Alliance) तुफान प्रहार केले.


नरेंद्र मोदी म्हणाले, “काँग्रेसने गेल्या दहा वर्षांत १०० चा आकडा गाठला नाही आणि पुढच्या १० वर्षांनीही काँग्रेस १०० चा आकडा पार करू शकणार नाही. २०१४, २०१९ आणि २०२४ या तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसला जितक्या जागा मिळाल्या त्या सर्व जागा आम्हाला या एका निवडणुकीत मिळाल्या आहेत. इंडिया आघाडी पूर्वी हळूहळू बुडत होती. पण आता मी स्वच्छपणे पाहू शकतो की ते आता तेजीने आणखी खोल जाणार आहेत”, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली.


“इंडिया आघाडी देशातील सामान्य नागरिकांच्या भावना समजू शकले नाहीत. भारताच्या सामान्य व्यक्तींचीही काही मतं आहेत. जे नेते जमिनीशी जोडलेले असतात त्यांनाच सामान्य नागरिकांच्या भावना समजू शकतात. पण ते तिथे कमी पडले. मी आशा करतो की ते लोकशाहीचा सन्मान करतील. पंरतु, त्यांच्या व्यवहारामुळे वाटतं की कदाचित त्यांच्यात ही क्षमता येण्याची वाट पाहावी लागेल”, असंही ते पुढे म्हणाले.


“आपल्या पक्षाच्या पंतप्रधानाला हे किंमत देत नाहीत. त्यांचे अध्यादेश फाडतात. यांच्या नेत्यांना परदेशातील कार्यक्रमात खुर्ची नसायची. लोकशाही आपल्याला सर्वांचा आदर करायला शिकवते. विरोधी पक्षातही जे खासदार जिंकून आले आहेत, मी त्यांचंही अभिनंदन करतो. गेल्या १० वर्षांपासून मला एका गोष्टीची उणीव जाणवत होती. सखोल चर्चा, उत्तम वाद-विवाद या गोष्टींची उणीव भास होती, या नव्या खासदारांच्या निमित्ताने ही उणीव कमी भासेल अशी आशा व्यक्त करतो", असं मोदी म्हणाले.

Comments
Add Comment

मोठा अपघात टळला; फर्रुखाबादमध्ये खाजगी विमानाचा अपघात

फर्रुखाबा : उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथील विमान तळावर आज सकाळी एका खासगी विमानाचा

विषारी कफ सिरपमुळे २३ चिमुरड्यांचा मृत्यू, कंपनीच्या संचालकाला अटक

नवी दिल्ली : श्रीसन फार्मा कंपनीच्या कोल्ड्रिफ कफ सिरपच्या एका बॅचच्या निर्मिती प्रक्रियेत गंभीर गडबड झाली.

आंध्र प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, ६ ठार

रायावरम (वृत्तसंस्था): आंध्र प्रदेशातील डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील रायावरम येथील एका फटाक्याच्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज, ९ ऑक्टोबर पासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर येत आहेत. ११

ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उत्तराखंडात बर्फवृष्टी, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

दार्जिलिंग (वृत्तसंस्था): ऑक्टोबरच्या उत्तराखंडात सुरुवातीलाच मोठ्या बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. चाळीस

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'झोहो' मेल स्वीकारला, 'स्वदेशी' तंत्रज्ञानाला दिला जोर

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता ई-मेलसाठी गूगल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या परदेशी