Nanded Crime : धक्कादायक! शेताच्या बांधावर आढळला विचित्र अवस्थेतील मृतदेह

पायात जोडवी, हातात बांगड्या अन् अर्धवट जळालेले...


नांदेड : काही दिवसांपूर्वी वाशिम जिल्ह्यातील काटेपूर्णा जंगलात एक विचित्र अवस्थेतील मृतदेह आढळला होता. ते प्रकरण ज्वलंत असतानाच माहूर तालुक्यात अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. माहूर ते किनवट या राष्ट्रीय महामार्गावरील एका शेतात महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला आहे. हिवळणी येथील तुलसीराम राठोड यांच्या शेताच्या बांधावर हा मृतदेह आढळला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.



नेमकं प्रकरण काय?


काल रात्री नांदेड जिल्ह्यातील हिळवणी येथील एका शेतकऱ्याच्या शेतात एका अज्ञात महिलेचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. शेतातील लाकूडफाटा घेऊन हा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. माहूर -किनवट या राष्ट्रीय महामार्गाजवळ तुळशीराम राठोड यांचे शेत आहे. या शेतात रात्री मोठ्या प्रमाणात आग दिसल्याने राठोड हे शेताकडे आले. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. सर्व आग विझल्यावर त्या ठिकाणी अज्ञात महिला जळालेल्या अवस्थेत दिसल्याने त्यांनी माहूर पोलीसांना माहिती दिली.



घात की अपघात


या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर पोलिसांनी धाव घेत घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेच्या हातात बांगड्या आणि पायात जोडवे दिसून आले आहेत. या व्यतिरिक्त तिची ओळख पटण्यासारखा कुठलाही पुरावा आढळून आला नाही. तर या महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलीस तपास करीत आहेत.


दरम्यान, हिळवणी गावात सध्या तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर हा घातपात होता की आत्महत्या याचा पोलीस कडक तपास करत आहेत.

Comments
Add Comment

Ganesh Naik : हत्तीसह वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई वाढविण्याचा विचार करा

- वनमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश मुंबई : हत्ती व अन्य वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान

Chandrashekhar Bawankule : सातबारावर नाव नसलेले शेतकरी आता शासकीय रेकॉर्डवर येणार

- २.३१ लाख शेतकऱ्यांच्या 'ॲग्रीस्टॅक'चा मार्ग मोकळा; सर्वांना कर्जमाफी आणि शासकीय योजनांचा मिळणार लाभ - मंत्री

SIR : राज्यात अद्यापही १ कोटी ८० लाख ६० हजार मतदार 'एसआयआर'बाहेर

७७ टक्के मतदारांकडून प्रक्रिया पूर्ण; शहरी भागात अनास्था, १७ ऑगस्टला संपणार मुदत मुंबई : देशभरात सुरू असलेल्या

Chandrashekhar Bawankule : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात प्रतिज्ञापत्रांऐवजी स्वयंघोषणापत्राला प्राधान्य

१० सेवांची पुनर्रचना; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय मुंबई : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात

Viksit Bharat Youth Conclave 2026 : पुण्यात रंगणार ‘विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह-2026’; देशभरातील 1,000 युवकांचा सहभाग

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरातील युवकांना क्रीडा, तंत्रज्ञान, नवोन्मेष, उद्योजकता आणि संस्कृतीच्या माध्यमातून

CSMT : सीएसएमटीच्या प्रत्येक रेल्वेगाडीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या उद्घोषणेची मागणी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र मुंबई : छत्रपती शिवाजी