मुंबई: आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये अनेकजण कमकुवतपणा आणि थकवा येत असल्याची तक्रार करत असतात. कमकुवतपणा आणि थकव्यामुळे व्यक्तीच्या रोजच्या जीवनातील कामेही प्रभावित होत असतात.
थकवा तसेच कमजोरीपासून दूर राहण्यासाठी आपल्याला संतुलित जेवण करणे गरजेचे असते. सोबतच आपल्या डाएटमध्ये काही अतिरिक्त पोषकतत्वांनी भरलेल्या पदार्थांचा समावेश करणेही गरजेचे असते.
येथे आम्ही तुम्हाला अशा पदार्थाबद्दल सांगणार आहोत ज्याच्या रोजच्या सेवनाने तुम्ही शरीरातील कमजोरी आणि थकवा दूर करू शकता तसेच शरीरात ताकद निर्माण होईल.
या पदार्थाचे नाव आहे अक्रोड. अक्रोडमध्ये प्रोटीन, फॅट, फायबर, फायटोस्टेरॉल, ओमेगा ३ फॅटी अॅसिड सारखी तत्वे आढळतात जे शरीराला आतून ताकद देतात.
अक्रोड हा अल्फा लिनोलेनिक अॅसिडचा मोठा स्त्रोत आहे. यात ओमेगा ३ फॅटी अॅसिड मोठ्या प्रमाणात असते. अक्रोडमध्ये आढळणारी पोषकतत्वे ही त्वचेला निरोगी ठेवण्यास मदत करतात. तसेच एजिंगची लक्षणे कमी करतात.
अक्रोडमध्ये जी अँटी ऑक्सिडंट असतात त्यामुळे हृदय आणि मेंदूचे आरोग्य चांगले राहते. यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. हृदयरोग आणि कॅन्सरची जोखीम कमी होते.
अक्रोड वजन कमी करण्यास मदत होते कारण यात आढळणारी पोषकतत्वे मेटाबॉलिज्म वेगवान करण्यात मदत करतात तसेच शरीराची चरबी घटवतात.
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…