Devendra Fadnavis : सरकारमधून मोकळं करण्याच्या फडणवीसांच्या निर्णयावर काय म्हणाले मुख्यमंत्री?

एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया आली समोर


मुंबई : लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) काल निकाल लागला आणि यात महायुतीला (Mahayuti) महाराष्ट्रात अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. महायुतीला केवळ १७ जागांवर समाधानी राहावे लागले तर दुसरीकडे महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) ३० जागांवर विजय मिळवला. यानंतर आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या पराभवाची जबाबदारी स्वतःवर घेत सरकारमधून मोकळं करण्याची विनंती पक्षनेतृत्वाकडे केली आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी याबाबत घोषणा केली. अनपेक्षित जागा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा त्याग करण्याची तयारी दर्शवली आहे.



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?


दरम्यान, फडणवीसांच्या निर्णयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र आम्ही भविष्यातही एकत्र काम करणार असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले, निवडणुकीत हारजित होत असते. एका निवडणुकीमुळे आम्ही खचणार नाही. एकत्र टीम म्हणून भविष्यातही काम करणार आहोत. आम्ही एकत्र काम केलं आहे. त्यामुळे सध्याच्या कामगिरीची जबाबदारी ही सामूहिक आहे. आमच्या एकूण जागा जरी कमी झाल्या असल्या तरी राज्यातील मतांची टक्केवारी जास्त आहे," असं एकनाथ शिंदे म्हणाले.



पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, मोदीजींकडे विकासाचा अजेंडा आहे. पराभवाची कारणमीमांसा केली जाईल. गेल्या दोन वर्षात राज्यात अनेक चांगले निर्णय सरकारने घेतले. या निवडणुकीत जागा कमी झाल्या असल्या तरी मते वाढली आहेत. देवेंद्रजी यांनी भावना व्यक्त केल्या असतील तरी मी त्यांच्याशी बोलेन. अपयशाने खचून जाणारे आम्ही लोक नाही. जनतेची दिशाभूल करुन मते मिळवण्याचा प्रयत्न केला हे तात्पुरते यश आहे. आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जाणारे आहोत. विरोधकांच्या अपप्रचारामुळे जनतेचा संभ्रम दूर कमी करण्यात आम्ही कमी पडलो. मुंबईत महायुतीला दोन लाख अधिक मते मिळाली. मूळ मतदार महायुतीबरोबर असल्याचे दिसून आले, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Comments
Add Comment

'आयुष'च्या ४२८५ रिक्त जागा, होमिओपथी, आयुर्वेद, युनानी अभ्यासक्रमांचे प्रवेश

महाराष्ट्र : आरोग्यविज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सरकारी आणि खासगी महाविद्यालयांकडून राबवण्यात

शिक्षक होण्याची सुवर्णसंधी, CTETची अधिसूचना जाहीर

मुंबई : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार केंद्रीय शिक्षक पात्रता

उत्तम आरोग्यासाठी महापालिका आयुक्तांनी केल्या अशा सूचना

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईकरांनी आपल्या उत्तम आरोग्यासाठी उद्यानात आणि व्यायामशाळेत श्रम घेणे गरजेचे आहे.

पक्षप्रतिमा जपण्यासाठी अजित पवार संघापासून चार हात दूरच!

मुंबई  : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. हा कार्यक्रम

पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेवर दि. २५ ते २६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री वसई रोड आणि भाईंदर स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर

Mumbai Megablock : मेगा 'ब्लॉक डे' मुंबईकरांना सतावणार! 'लाईफलाईन' लोकलची दुरुस्ती; कोणत्या मार्गांवर सेवा पूर्णपणे बंद राहणार?

मुंबई : मुंबईची लाईफलाइन (Mumbai Lifeline) असलेली उपनगरीय रेल्वे (Suburban Railway) लाखो प्रवाशांना घेऊन अविरत धावत असते. या लोकलच्या