USA vs Canada: अमेरिकेने जिंकला टी-२० वर्ल्डकपमधील पहिला सामना, कॅनडाला ७ विकेटनी हरवले

मुंबई: आयसीसीच्या टी-२० वर्ल्डकपच्या सामन्यांना सुरूवात झाली आहे. यातील पहिल्याच सामनन्यात अमेरिकेने कॅनडाला हरवले आहे. अमेरिकेने ७ विकेटनी विजय मिळवला. सामन्यात अमेरिकेने टॉस जिंकत पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्यासाठी योग्य ठरला. आव्हानाचा पाठलाग करताना अमेरिकेसाठी एरोन जोन्सने सर्वाधिक खेळी करत ४० बॉलमध्ये ४ चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने नाबाद ९४ धावा ठोकल्या.


याशिवाय एंड्रीस गूसने ४६ बॉलमध्ये ७ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६५ धावा केल्या. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १३१ धावांची भागीदारी केली. डलासच्या ग्रांड प्रेयरी स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात कॅनडाने पहिल्यांदा बॅटिंग करताना २० षटकांत ५ बाद १९४ धावा केल्या होत्या.


संघासाठी नवनीत धालीवालने मोठी खेळी करताना ४४ बॉलमध्ये ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६१ धावा केल्या होत्या. त्यानंतर या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या अमेरिकेच्या संघाने १७.४ षटकांतच हे आव्हान पूर्ण केले.



असा अमेरिकेने जिंकला सामना


१९५ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या अमेरिकेची सुरूवात खराब झाली. संघाने पहिल्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर पहिला विकेट स्टीवन टेलरच्या रूपात गमावला. तो खाते न खोलता पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर कर्णधार मोनांक पटेल आणि एंड्रीस गूसने दुसऱ्या विकेटसाठी ४२ धावांची भागीदारी केली. यानंततर मोनांक १६ धावांची खेळी करून बाद झाला.


यानंतर एंड्रीस गूस आणि एरोन जोन्सने तिसऱ्या विकेटसाठी ५८ बॉलमध्ये १३१ धावांची भागीदारी केली. यामुळे सामना अमेरिकेच्या बाजूने झुकला.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत