Monday, April 21, 2025
Homeसाप्ताहिककिलबिलसुजाण पालकत्व

सुजाण पालकत्व

मनस्विनी – पूर्णिमा शिंदे

आपली मुलं हीच आपली संपत्ती! आपण आपल्या मुलांना वाढवताना आपल्यातील चांगले वाईट गुण ते ग्रहण करतात. आपली मुलं आपले अनुकरण करत असतात. सर्व पालक वर्ग आपापल्या मुलांना खूप कष्टाने मोठे करतो. संगोपन, शिक्षण, बालपण यासाठी खूप परिश्रम घेतो. आपली मुले आनंदात राहावी यासाठी क्षणक्षण रात्रंदिवस मेहनत घेणारा पालक वर्ग घाम गाळून कष्ट करून जे जे हवं ते हौस मौज पुरवत असतात. मग स्वतःच्या आवडीनिवडीचं काहीही केलं जात नाही तिथे स्वतःला मुरड घालून पैसे साठवून आपल्या मुलांसाठी सारे करतात. अगदी जन्मपासूनच पाहा तुम्ही तुमचे अपत्य जन्माला आल्यानंतर त्याच्या त्या बाळलीला, कृष्णलीला याचं कौतुक आई-वडिलांना असतंच, जगातली प्रत्येक गोष्ट आपल्या मुलांना सर्वोत्तम देण्यासाठी आपण मात्र हाडाची काडे करत असतो. साधं देवळात गेलो तरी स्वतःसाठी न मागता एकमेव माझ्या बाळाला सुखाचे ठेव,पास कर, नोकरी मिळू दे , लग्न होऊ दे, चांगला जावई मिळू दे हे मागणे मागतच असतो. मुले ही त्यांच्या खेळण्या बागडण्याच्या वयात शाळा, ट्युशन, कॉलेजमध्ये आनंद घेत शिकत, घडत असतात. सर्व दिनचर्येत पालकांकडूनही ती अशीच शिकत असतात. अशाप्रकारे शिकता शिकता आपणही त्यांना योग्य ते सहाय्य केले पाहिजे. ती घडत असताना त्यांच्या भविष्यात आपल्या पायावर ठाम उभे राहावे. आपले नाव, प्रतिष्ठा, इमेज उज्वल,भवितव्य घडण्यासाठी प्रयत्नांती परमेश्वर. घडत घडत जिद्द सचोटीने मुलांना घडवावे. ध्येय, यशाप्रती, आशावादी दृष्टिकोन, आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टी ठेवण्यास शिकवावे.

आजवर आपल्याला आलेल्या अनुभवांचे, सत्कर्मांचे ज्ञान, माहिती त्यांना जरूर द्यावी. कल्पना त्यांना द्यावी. पण मुलांना घडवावे. कर्म, ज्ञान, भक्तीयुक्त संस्कृती सांगणारे साने गुरुजी, श्यामची आई भावनिक जडणघडण देणारी त्यांना कळावेत. विवेकाचा राजा विवेकानंदांचे चारित्र्य, आदर्श, प्रखर बुद्धिमत्ता, मुलांना द्यावी. छत्रपती शिवरायांचे प्रताप, पराक्रम शौर्य, व्यवस्थापन शत्रूला नेस्तनाबूत करण्याचे संघटनेचे महत्त्व कुशल संघटन स्वराज्य निर्मितीचे साकारलेले भव्य दिव्य यश मुलांच्या मनावर बिंबवावे. प्रतिकूल परिस्थितीतही डॉ. अब्दुल कलाम यांसारखे शिक्षण घेताना केलेले परिश्रम, त्याचप्रमाणे प्रतिकूल परिस्थितीतही डॉ. आंबेडकरांचे वाचनावरील अढळ श्रद्धा, शिक्षणावरील प्रेम आणि समाजकार्य शिकवावे. ज्ञानार्जनासाठी लंडन येथे आठ वर्षांची पदवी अवघ्या दोन वर्षात मिळवणारे अथक सायास परिश्रमातून घटनेचे शिल्पकार ठरलेले महामानव समजून सांगावे. रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यास करणारे टिळक समजवावेत. अंदमानच्या तुरुंगवासातही मातृभूमीवर श्रद्धेने तळमळणारे अनेक कोसावरून नसानसांत सागरा प्राण तळमळला अशा या थोरा-मोठ्यांच्या गोष्टींनी सुसंस्कारित करताना मुलांच्या मनावर हे बिंबवावे. आजही आपण आपल्यासह इतरांच्या भल्याचा विचार करावा. आपण पालक सारे आपला पाल्य किती वेळ बाहेर असतो? बरोबर कोण असतं? कसा वागतो? काय खातो ? खरा बोलतो का? या सर्व बाबींवर आई-वडिलांनी वेळीच टाका घातला तर सारं उसवत नाही.

सोशल मिडियाचा अतिरिक्त वापराला आळा बसला पाहिजे! जागरण, रात्रीची उशिरा येणं, जागणं, त्यात दंग होणं किंवा एखाद्या अशा मुलांना कानाला पकडून जाब विचारावा व्यसनांच्या आहारी गेलेल्या पिढीला जरब द्यावी. समुपदेशन द्यावे. यातून बाहेर काढावे. नकारात्मक नैराश्य व वैफल्यग्रस्त युवा पिढीला तणाव व्यवस्थापनाचे धडे द्यावेत. आपले कुटुंब, संस्कार, शिक्षण, वेळ, मूल्य जीवन यांच्याकडे तुम्ही कोणत्या दृष्टीने पाहतायत हे पाहावे. उधळा ,खर्चिक, महागड्या, ऐहिक व भौतिक सुख यावर खर्च करणाऱ्या युवा पिढीला पै पै चा हिशोब ठेवण्यास प्रवृत्त करावे. बचतीच राजमार्ग, अर्थव्यवस्थापनाचे शिक्षण द्यावे. अनुभवी, मार्गदर्शन करावे. नोकरी, व्यवसायासह जोडधंदा, छोटे-मोठे पॉलिसी अथवा जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात यावी. आयुष्याच्या लढाईत जगताना सुखदुःखे, यशापयश हाताळता यावे. परिस्थिती हाताळाता आली पाहिजे. त्याचे पुढचे परिणाम कळले पाहिजेत. अशा संघर्षमय परिस्थितीमध्ये ते कोलमडून न जाता स्वतःचे निर्णय स्वतः घेऊन त्यातून मार्ग काढावे. त्यांच्या मनावर सातत्य, कामाचे नियोजन, नियमितता, अर्थार्जण, कौटुंबिक नातेसंबंध, मानसिक संतुलन, सुदृढ आरोग्य हेही त्याबरोबरच धडे देणे गरजेचे आहे. यासाठी आपणही आपल्या मुलांना योग्य तो आवश्यक वेळ, संस्कार द्यावेत. थोडा-मोठ्यांचा आदर करण्याचे, मूल्य जोपासावे. हे सगळं आपण देतोच! पण.. हा

हा पण जातो आहे एका विशिष्ट गोष्टीकडे चोरी, दरोडा, व्यसन, मुजोर, गुंडगिरी या बाबीकडे वेदांत अग्रवाल आपल्या अवतीभोवती असतील कितीतरी. कृपया अशा विक्षिप्त, विचित्र माजलेल्या युवा पिढीला चांगले संस्कार वेळीच दिले. परिस्थिती मोल, मूल्य पैशात मोजता येत नाही गेलेली वेळ पुन्हा मिळत नाही. त्यासाठी घाम गाळायची मेहनत करण्याची सवय त्यांना अंगी कारावी नाहीतर पुढची युवा पिढीचे भवितव्य धोक्यात आणण्यास पालक जबाबदार असतील! हेच आहे सुजाण पालकत्वाचे महत्त्वाचे सूत्र.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -