Sunday, July 7, 2024
Homeताज्या घडामोडीबाहेर गेलेल्या कंपन्या कोणाच्या काळात गेल्या : आ. नितेश राणे

बाहेर गेलेल्या कंपन्या कोणाच्या काळात गेल्या : आ. नितेश राणे

उद्धव ठाकरे यांनी दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवून सांगण्याचे आवाहन

शिर्डी : उद्धव ठाकरेंनी आपल्या दोन्ही मुलांचा डोक्यावर हात ठेवून सांगावे की या कंपन्या आताच बाहेर गेल्या आहे की कोरोना काळात गेल्या आहेत. आतापर्यंत जेवढ्याही कंपन्या बाहेर गेल्या आहेत, त्यांना परत आणण्याचे काम आमचे महायुतीचे सरकार करत आहे. उद्धव ठाकरे खोटारडा माणूस असल्याचे सांगत भाजपाचे प्रवक्ते नितेश राणेंनी ठाकरेंचा समाचार घेतला.

भाजपाचे नेते आ. नितेश राणे यांनी परिवारासह शुक्रवारी साईसमाधीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी साईसमाधीवर त्यांनी शाल चढवली. यावेळी साईबाबा संस्थानचे जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके उपस्थित होते. साईदर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी म्हटले की, ४ जुन रोजी लोकसभेचा निकाल लागणार आहे. निकाला आधी साईबाबांच्या दर्शनासाठी सहपरिवार आलो आहे. देशाला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी देशाचे पंतप्रधान पुन्हा एकदा नरेंद्र मोदी व्हावे, अशी प्रार्थना साईबाबांच्या चरणी केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात कंपन्या बाहेर गेल्या. उद्धव ठाकरे लंडनमध्ये बसून खोटी माहिती देत असेल तर लंडनमधून परत येवू द्यायचे का? याबद्दल महाराष्ट्रातील जनता विचार करेल. लंडनमध्ये बसुन महाराष्ट्राची प्रतिमा खराब करत असेल तर लंडनमध्येच ठाकरेंना पॅकअप करायला पाहिजे असल्याची टीका त्यांनी ठाकरेंवर केली.

भाजपा प्रवेशासाठी अनेकांची नावे

विजय वडेट्टीवार ज्या ठिकाणावरून निवडणुकीच्या रिंगणात उतरतात तेथे आमचे लोक प्रतिनिधी निवडून येतात. त्यामुळे विजय वडेट्टीवार यांनी चार जूननंतर भाजपवासी होण्याची तयारी करावी. महाविकास आघाडीत फूट पडलेली आहे. ती फक्त बाहेर येण्याचे बाकी आहे, महाविकास आघाडीतून कोण कोण बाहेर पडणार हे चार जूननंतर समोर येईल. आम्हाला निवडणुकीच्या काळात काँग्रेसच्या ज्या लोकांनी आतून मदत केली आहे. हे सगळेजण चार जूननंतर भाजपामध्ये प्रवेश करतांना दिसतील. यामध्ये विजय वडेट्टीवार यांचेही नाव असल्याचे मी ऐकतोय, असेही यावेळी राणे म्हणाले.

जाणूनबुजुन अपमान करण्याचे कृत्य

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. हे कृत्य भाजपच्या नेत्यांकडून घडले असते तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी धींगाणा घातला असता. जितेंद्र आव्हाडने माफीपर्यंत न थांबता आपल्या हातात काय असते, आपण काय फाडतोय याची जाणीव सर्वांनाच असते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करण्याचा तर कधी औरंगजेबाचे उदात्तीकरण, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान, मग म्हणायचे की डॉ बाबासाहेब आंबेडकर आमचा बाप आहे, असे उच्चार करण्याची मग तुमची हिमत कशी होते ? अपमान करण्याचे कृत्य जितेंद्र आव्हाड यांनी जाणून बुजून केले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -