Tuesday, April 29, 2025

देशमहत्वाची बातमी

उष्णतेचा कहर! मिर्झापूरमध्ये निवडणूक ड्युटीवरील होमगार्डच्या ६ जवानांसह ९ जणांचा मृत्यू

उष्णतेचा कहर! मिर्झापूरमध्ये निवडणूक ड्युटीवरील होमगार्डच्या ६ जवानांसह ९ जणांचा मृत्यू

लखनऊ: उत्तर प्रदेशात उष्णतेचा कहर वाढतच चालला आहे. या वाढत्या उष्णतेमुळे मिर्झापूरमध्ये ९ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मिर्झापूरमधील उन्हाळा जीवघेणा ठरत आहे. येथे हीट स्ट्रोकमुळे निवडणूक ड्युटीवर गेलेल्या ६ होमगार्डच्या जवानांसह ९ लोकांचा मृत्यू झाल आहे. यात मरणाऱ्यांची संख्या एक लिपिक आणि एक सफाई कर्मचाऱ्यांसह आणखी एकाचा समावेश आहे.

याची सूचना मिळताच जिल्हा निर्वाचन अधिकाऱ्यांसह अनेक अधिकारी ट्रामा सेंटरमध्ये पोहोचले. निवडणूक ड्युटीवरून आलेल्या एकूण २३ जवानांना मंडलीय चिकित्सालयाच्या ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. यात २० होमगार्ड, एक फायर, एक पीसी आणि एका पोलीस जवानाचा समावेश आहे. या सर्वांची स्थिती बिघडल्याने ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते.

मेडिकल कॉलेजचे प्राध्यापक डॉ. आर बी कमल यांनी याबाबत सांगितले की आमच्याकडे एकूण २३ जवान आले. यात एक पीसीचे आहेत. एक फायर सर्व्हिस आणि एक पोलीस आहेत. बाकी २० होमगार्ड होते. ६ होमगार्ड जवानांचा मृत्यू झाला आहे. दोन जवान गंभीर अवस्थेत आहेत. या जवानांना खूप ताप होता.

Comments
Add Comment