Friday, October 11, 2024
Homeक्रीडा६ महिन्यांपासून नताशा-हार्दिकमध्ये आलबेल नाही, लवकरच होणार घटस्फोट?

६ महिन्यांपासून नताशा-हार्दिकमध्ये आलबेल नाही, लवकरच होणार घटस्फोट?

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री नताशा स्टेनकोविक यांच्यातील घटस्फोटांच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, या प्रकरणी दोघांनीही मौन बाळगले आहे. मात्र एकामागोमाग एक प्रकारच्या मीडिया रिपोर्ट्समधून त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले आहे.

यातच आता एक आणखी रिपोर्ट आला आहे यात दावा करण्यात आला आहे की हार्दिक आणि नताशा यांच्यात गेल्या ६ महिन्यांपासून आलबेल नाही. दोघांच्या वैवाहिक जीवनात तणाव निर्माण झाला आहे. असे मानले जात आहे की हे स्टार कपल घटस्फोट घेऊ शकते.

मे २०२०मध्ये केले होते लग्न

नताशा आणि हार्दिक यांनी काही काळ डेटिंग केल्यानंतर जानेवारी २०२०मध्ये त्यांनी साखरपुडा केला होता. यानंतर लवकरच लॉकडाऊनदरम्यान या कपलने लग्न केले होते. मे २०२०मध्ये दोघांनी गुपचूप लग्न उरकले होते.

हार्दिक-पांड्याला अगस्त्य आहे मुलगा

साखरपुडा झाल्यानंतर ६ महिने आणि लग्नाच्या एक महिन्यानंतरच नताशा आणि हार्दिक एका मुलाचे आई-वडिल बनले होते. त्याचे नाव अगस्त्य आहे. लग्न आणि साखरपुडा दरम्यान नताशा प्रेग्नंट होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -