दिल्लीत पारा ५२.३ अंशावर! तापमानाने १०० वर्षाचा विक्रम मोडला!

नवी दिल्ली : उत्तर भारतात सध्या उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. भारताची राजधानी नवी दिल्लीमध्ये सूर्य आग ओकतोय, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दिल्लीमध्ये भीषण उष्णतेची लाट आली आहे. दिल्ली येथे ५० डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली असून, तीव्र उष्णतेची लाट कायम आहे. दिल्लीमध्ये तापमानाने १०० वर्षांचा विक्रम मोडीत काढला आहे. दिल्लीत ५२.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.


हवामान विभागाने आज दिल्लीसाठी उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केला होता. दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसात रेकॉर्ड ब्रेक गरमी पाहायला मिळत आहे. आज बुधवारी राजधानी दिल्लीतीन मुंगेशपूर भागात सर्वाधिक ५२.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.


दिल्लीला मान्सून दाखल होईपर्यंत संपूर्ण जून महिना निघून जाईल. त्यामुळे जून हा महिना दिल्लीकरांना आणखी रडवणार आहे, असं हवामान खात्यानं सांगितलं आहे.


दरम्यान, उत्तर भारतात जणू आकाशातून आगीच्या ज्वाळा बाहेर पडत आहेत, अशी गरमी जाणवत आहे. राजस्थानच्या चुरूमध्येही पारा ५० अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. झांशी, यूपीमध्ये दिवसाचे तापमान ४९ अंश होते. आग्रामध्ये पारा ४८.६ अंशांवर आणि वाराणसीमध्ये ४७.६ अंश सेल्सिअस तापमान होते.

Comments
Add Comment

भारताने पुन्हा एकदा गाठला एक अब्ज टन कोळसा उत्पादनाचा टप्पा

- देशाच्या ऊर्जा सुरक्षेला मिळणार आणखी बळकटी भारताने २० मार्च २०२६ रोजी सलग दुसऱ्या वर्षी १ अब्ज टन कोळसा

Iran-US-Israel War : भारतीय भूमीचा इराण हल्ल्यासाठी वापर नाही; भारताने फेटाळून लावले 'ते' दावे

भारत सरकारने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका दाव्याचे खंडन करत स्पष्ट केले आहे की, भारताने अमेरिकेला आपल्या

आसाममध्ये पोलीस कमांडो कॅम्पवर दहशतवादी हल्ला

तिनसुकिया : आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील पोलीस कमांडो कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. रविवारी मध्यरात्री

तिबेटशी व्यापार करणाऱ्या भारतीयांसाठी आनंदाची बातमी

पिथोरगड : भारतीय व्यावसायिक जून २०२६ पासून तकलाकोटमधील कायमस्वरुपी दुकानांतून तिबेटशी थेट व्यापार करू शकणार

विमान प्रवास महागणार? देशांतर्गत भाड्यावरील मर्यादा हटवण्याचा केंद्राचा निर्णय

मुंबई : देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. केंद्र सरकारने देशांतर्गत विमान भाड्यांवरील

Indian Navy : भारतीय नौदलाची नवी स्टेल्थ युद्धनौका ‘तारागिरी’ लवकरच नौदलाच्या ताफ्यात केली जाणार समाविष्ट

भारताच्या सागरी सार्वभौमत्वाच्या क्षेत्रातील निर्णायक क्षण, असे वर्णन करता येईल, अशा शानदार समारंभात, भारतीय