Share

मुंबई: लक्ष्मी माता ही लक्ष्मी, धन आणि समृद्धीची देवता आहे. लक्ष्मी मातेच्या कृपेने मनुष्याच्या जीवनात कधीही धन तसेच वैभवाची कमतरता येत नाही. लक्ष्मी माता प्रसन्न होण्यासाठी लोक नानाविध उपाय करत असतात. दरम्यान, काही कामे केल्याने मात्र लक्ष्मी माता नाराज होऊ शकते. जाणून घेऊया त्याबद्दल…

लक्ष्मी माता त्याच घरात वास करते ज्यांच्या घरात सुख-शांती आणि प्रेमाचे वातावरण असते. ज्या घरात पती-पत्नीमध्ये सतत वाद होत असतात, तसेच ज्या घरात महिलांचा सन्मान केला जात नाही तेथे लक्ष्मी कधी येत नाही.

पती-पत्नीमध्ये होणाऱ्या वादामुळे घरात नकारात्मक उर्जा निर्माण होते. शास्त्रात सांगितले आहे की जे पती दर छोट्या छोट्या गोष्टीवरून आपल्या पत्नीशी वाद घालतात त्यांना लक्ष्मी मातेची नाराजी झेलावी लागते. अशा घरात नेहमीच कंगाली असते.

वाद आणि भांडणे केवळ नकारात्मक उर्जा निर्माण करतात. यामुळे घरात अशांती आणि तणावाचे वातावरण असते. लक्ष्मी माता ही शांती आणि सकारात्मकतेची देवी आहे. यामुळे नकारात्मक वातावरणात ती राहत नाही.

पती-पत्नी नेहमीच भांडणे करत असतील तर याचा अर्थ ते एकमेकांसोबत सुखी नाहीत. लक्ष्मी माता सुख-समृद्धी आणि संतोषाची देवता आहे. यासाठी ती त्याच घरात राहते जिथे लोक संतुष्ट असतात.

Tags: laxmi

Recent Posts

श्रीलंका दौऱ्यापासून भारताचा नवा प्रशिक्षक रुजू

जय शहा यांची माहिती नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टीम इंडियाचे नवे मुख्य प्रशिक्षक कोण? या…

36 mins ago

Test match : भारतीय महिलांचा दणदणीत विजय

कसोटी सामन्यात द. आफ्रिकेवर दहा विकेट्स राखून सरशी चेन्नई (वृत्तसंस्था) : शफाली वर्माचे द्विशतक (२०५…

2 hours ago

संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे, ही गंभीर बाब

पंतप्रधान मोदींची राहूल गांधींवर टीका नवी दिल्ली : विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांचे वक्तव्य गंभीर…

2 hours ago

मेधा पाटकर यांना ५ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा

मानहाणी प्रकरणी साकेत न्यायालयाचा निर्णय नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना मानहाणी प्रकरणी…

2 hours ago

पुण्यात आढळला झिकाचा पाचवा रुग्ण

पुणे : एरंडवणेतील गणेशनगरमधील २८ वषीय गर्भवतीला लागण झाल्याने झिकाचा संसर्ग इतरत्र पसरल्याचीही भीती व्यक्त…

4 hours ago

दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगला स्थगिती

देवेंद्र फडणवीसांची विधिमंडळात घोषणा! मुंबई : दीक्षाभूमी परिसरात चालू असलेल्या भूमिगत पार्गिंकच्या कामाला आंबेडकरी अनुयायांकडून…

5 hours ago