Mahavitaran Recruitment : बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! महावितरण नोकरीची सुवर्णसंधी

'या' तारखेआधीच करा अर्ज; जाणून घ्या सविस्तर माहिती


मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक मंडळातर्फे (Maharashtra Board) घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल (HSC Result) जाहीर करण्यात आला. बारावीनंतर अनेक विद्यार्थी मिळेल त्या नोकरीच्या शोधात असतात. अशाच नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी म्हणजेच महावितरणमध्ये मेगाभरती (Mahavitaran Recruitment) सुरु करण्यात आली आहे. यामध्ये शंभर दोनशे नव्हे तर चक्क ५ हजाराहून अधिक रिक्त पदांसाठी भरती जारी केली आहे. भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून त्याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.



'या' पदासाठी रिक्त जागा


महावितरणमध्ये विद्युत सहाय्यकच्या एकूण ५ हजार ३४७ जागा भरल्या जातील. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातून किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराकडे आयटीआयचे सर्टिफिकेट असावे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्षांदरम्यान असावे.


विद्युत सहाय्यक पदासाठी अनुसूचित जाती संवर्गातून ६७३,अनुसूचित जमाती ४९१, विमुक्त जाती (अ) १५०, भटक्या जाती (ब) १४५, भटक्या जाती (क) १९६, भटक्या जाती (ड) १०८, विशेष मागास प्रवर्ग १०८, इतर मागास प्रवर्ग ८९५, ईडब्ल्यूएस ५०० तर खुल्या गटातील २ हजार ८१ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.



अर्जासाठी लागणारे शुल्क


खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून यासाठी २५० रुपये अधिक जीएसटी इतके शुल्क घेतले जाणार आहे. तर मागासवर्गीय, आर्थिकदृष्टया दुर्बल आणि अनाथ घटकांतील उमेदवारांना दिलेल्या सवलतीनुसार १२५ रुपये अधिक जीएसटी इतके शुल्क आकारले जाईल.



या तारखेआधी करा अर्ज


इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत. २०जून २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांना महावितरणची अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/ वर जाऊन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून अर्ज भरा. तसेच त्यात काही त्रुटी राहणार नाहीत, याची काळजी घ्या. अन्यथा अर्ज बाद करण्यात येईल, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.



पात्र उमेदवारांना मिळणारे मानधन


महावितरण कंपनीकडून पात्र उमेदवारांना विद्युत सहाय्यक प्रथम वर्षासाठी १५ हजार, द्वितीय वर्षासाठी १६ हजार तर तृतीय वर्षासाठी १७ हजार इतके मानधन दिले जाणार आहे.

Comments
Add Comment

Narendra Modi : आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध; पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, २१ व्या शतकासाठी आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यास

Kanpur Plane Crash : धक्कादायक! कानपूरमध्ये प्रशिक्षण विमान शेतात कोसळले; अनुभवी पायलटसह सह-पायलटचा अंत

कानपूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूर (Kanpur) येथे एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. गुरुवारी गंगा नदीच्या

Rule Change From 1st September : LPG गॅस सिलेंडर, आयटीआर अन् थेट तुमच्या...; १ सप्टेंबरपासून बदलणार ५ मोठे नियम!

ऑगस्ट महिना (August Month) अखेरच्या टप्प्यात आला असून १ सप्टेंबरपासून देशात अनेक महत्त्वाच्या आर्थिक आणि प्रशासकीय

Nepal Floods Impact on Bihar and UP : नेपाळच्या पुराचा बिहार-उत्तर प्रदेशालाही धोका; ७ जिल्ह्यांना अलर्ट, पुढील ४८ तास महत्त्वाचे

पाटणा : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुराचा परिणाम आता भारतातील सीमावर्ती राज्यांवरही होण्याची शक्यता आहे.

Dating App Gang : 'नको तेच केलं!' डेटिंग ॲपवरून तरुणाला जाळ्यात ओढले अन्...; जयपूरमध्ये ‘गे डेटिंग ॲप गँग’चा पर्दाफाश

जयपूर : गे डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून तरुणांशी मैत्री करून त्यांना भेटण्यासाठी बोलावायचे आणि त्यानंतर हल्ला

Gandak River : गंडक नदीची पाणीपातळी घटली; बिहारवरील पुराचा धोका टळला

नेपाळ आणि बिहारमधील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. गंडक म्हणजेच नारायणी नदीची पाणीपातळी वेगाने कमी होत