Pune Accident : पोर्शेनंतर पुण्यात आणखी एक भयंकर अपघात! ट्रकने दुचाकीला फरफटत नेलं आणि…

Share

दोन महाविद्यालयीन तरुणांचा जागीच मृत्यू

पुणे : पुण्यात (Pune) एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात पोर्शे कार चालवत दोन तरुणांना चिरडल्याच्या घटनेने सध्या खळबळ उडवून दिली आहे. हा मुलगा धनिकपुत्र असल्याने त्याला वाचवण्यासाठी अख्खी यंत्रणाच कशा प्रकारे कामाला लागली आहे, याचे रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत असतानाच आता आणखी एक अपघाताची घटना पुण्यातून (Pune Accident) समोर आली आहे. एका भरधाव ट्रकने एका दुचाकीला फरफटत नेल्याने दुचाकीवरील दोन महाविद्यालयीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने पुणे पुन्हा एकदा हादरलं आहे.

मालवाहतूक ट्रक वाघोलीतून पुण्याच्या दिशेने येत होता यावेळी खराडीतील जकात नाका चौकात हा अपघात घडला. काल रात्री साडेदहाच्या सुमारास भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडले. त्यात दोन महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यू झाला. हे दोन महाविद्यालयीन युवक मूळचे लातूरचे असून ते सध्या वाघोली येथे शिक्षण घेत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी ट्रक ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात आले आहे. श्यामबाबू रामफळ गौतम असे चालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम हा त्याचा ट्रक (MH 12 VF 6441) घेऊन चंदन नगरच्या दिशेने जात होता. जकात नाका येथे सिग्नलवर थांबलेल्या मोटरसायकला त्याने मागून जोरात धडक दिली. त्यामध्ये मोटरसायकल वरील असणारे ३ जण फरफटत गेले. या अपघातात २ जणांचा मृत्यू झाला तर १ जण जखमी आहे.

आदिल शेख असे एका तरुणाचे नाव असून इतर दोघांचे नाव समजू शकलेले नाही. घटनास्थळावरून ट्रक चालक याला ताब्यात घेऊन त्याला ससून हॉस्पिटल येथे वैद्यकीय तपासणीसाठी नेले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Recent Posts

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, दिनांक २९ जून २०२४.

पंचांग आज मिती ज्येष्ठ कृष्ण अष्टमी शके १९४६. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा. योग शोभन. चंद्र राशी…

3 hours ago

जनहितैषी अर्थसंकल्प!

ज्या अर्थसंकल्पाची महाराष्ट्रातील जनतेला उत्सुकता व आतुरता होती, तो अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार…

6 hours ago

एनडीए सरकारचा नवा संकल्प हवा

रवींद्र तांबे केंद्रात सरकार स्थापन झाले की, सर्वांचे लक्ष लागलेले असते ते म्हणजे देशाच्या केंद्रीय…

6 hours ago

एनटीएच्या अक्षम्य घोडचुका…

हरीश बुटले, करिअर सल्लागार पेपरफुटी किंवा सॉल्व्हर गँग हे समाजकंटक आणि नतद्रष्ट लोकांचे काम आहे…

7 hours ago

पैसाच पैसा, टी-२० वर्ल्डकप विजेता संघ होणार मालामाल, रनर-अप संघावरही कोट्यावधींचा पाऊस

मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने टी-२० वर्ल्डकप २०२४(t-20 world cup 2024) सुरू होण्याआधीच या स्पर्धेसाठी एकूण…

9 hours ago

Jio आणि Airtel युजर्स स्वस्तामध्ये करू शकता रिचार्ज, २ जुलैपर्यंत आहे संधी

मुंबई: जिओ(jio) आणि एअरटेलने(airtel) आपल्या रिचार्ज प्लान्सच्या किंमतीत मोठी वाढ केली आहे. कंपन्यांनी आपले प्लान्स…

10 hours ago