देशातील उष्णतेची लाट ओसरणार : महापात्रा

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशात उष्णतेची लाट सुरू आहे. लोक उष्णतेमुळे हैरान झाले होते. परंतु येत्या ३ दिवसात देशातील बहुतांश भागातील उष्णतेची लाट ओसरणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.


आयएमडीचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी सोमवारी ‘नैऋत्य मान्सून, २०२४ च्या पल्ल्याचा दुसरा टप्पा’ या विषयावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना देशातील बहुतांश भागातील उष्णतेची लाट पुढील तीन दिवसानंतर हळूहळू कमी होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. वायव्य भारत आणि देशाच्या मध्यभागी उष्णतेच्या लाटेपासून तीन दिवसांनंतर आराम मिळण्याची अपेक्षा आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तर आणि वायव्य भारतातील बहुतांशी राज्ये तीव्र उष्णतेच्या लाटेचा सामना करत आहेत.


दरम्यान पुढील तीन दिवसांनंतर दिल्ली, राजस्थान, हरियाणा या वायव्य आणि मध्य भागांमध्ये उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळणार आहे. गुरुवारपासून (दि.३० मे) उष्णतेची लाट कमी होण्यास सुरुवात होईल, असेही आयएमडी प्रमुख मृत्युंजय मोहापात्रा यांनी म्हटले आहे.


यंदा संपूर्ण देशात पावसाळ्यात (जून ते सप्टेंबर) सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज दि.२७ मे रोजी पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवरील भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे, तर ईशान्य प्रदेशात मंगळवार २८ मे पर्यंत अत्यंत मुसळधार पाऊस पडेल, असे देखील भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

कंगना राणौत हिंदी सल्लागार समितीची सदस्य बनली,जाणून घेऊया किती वर्षांचा असेल कार्यकाळ

नवी दिल्ली : प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणौत ही आता आपल्याला चित्रपटासोबत मंत्रालयामध्ये देखील पहायला मिळणार

किश्तवाड जिल्ह्यातील रतले जलविद्युत प्रकल्पात २९ संशयित मजूर ?

श्रीनगर  : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथे चिनाब नदीवर उभारल्या जाणाऱ्या ८५० मेगावॉट क्षमतेच्या ‘रतले हायड्रो

‘एगोज’च्या प्रसिद्ध ब्रँडची अंडी वादाच्या भोवऱ्यात

नवी दिल्ली  : अंड्याला आरोग्यासाठी ‘सुपरफूड’ मानले जाते, मात्र सध्या अंड्यांच्या गुणवत्तेवरून देशभरात एकच खळबळ

पत्नीकडे घर खर्चाचा हिशोब मागणे गुन्हा नाही

नवी दिल्ली  : पतीने पत्नीला घर खर्चाचा हिशोब ठेवण्यासाठी एक्सेल शीट बनवण्यास सांगणे क्रुरता नाही, तसेच या

अयोध्येच्या राम मंदिरात ७० नवे पुजारी

नवी मुंबई  : अयोध्येतील राम मंदिराचे काम पूर्ण झाले आहे. नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

चालक परवान्याचे वेळेत नूतनीकरण करणे अनिवार्य

नवी दिल्ली  : चालक परवान्याची मुदत ज्या दिवशी संपते, त्याच दिवसापासून संबंधित व्यक्तीचा चालक म्हणून असलेला दर्जा