मुंबई : बंगालच्या उपसागरात तयार झालेलं रेमल चक्रीवादळ (Cyclone Remal) आज पश्चिम बंगाल आणि बांग्लादेशच्या किनारपट्टीला धडकलं. किनारपट्टी भागात वाऱ्यांचा वेग १०० ते ११० किमी असल्यामुळे या चक्रीवादळाचा जोरदार फटका पश्चिम बंगाल किनारपट्टी भागाला बसला आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे जवळील भागातील अनेक गोष्टींचे नुकसान झाले आहे. पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनीही चक्रीवादळाच्या स्थितीचा आढावा घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर दिशेने चक्रीवादळाचा प्रवास सुरू आहे. मात्र जमिनीवरील प्रवास सुरू झाल्याने कमी दाबाच्या पट्ट्याचा जोर ओसरत जाईल असं भारतीय हवामान विभागाने सांगितलं. चक्रीवादळामुळे पावसाच्या सरी कोसळल्या असून अनेक भागात झाडंही कोसळली आहेत. त्यामुळे किनारपट्टी भागातील सुमारे १ लाख १० हजार लोकांचं स्थलांतर करण्यात आलं असल्याची माहिती मिळत आहे.
रेमल चक्रीवादळ रविवारी रात्री ८.३० वाजता किनारपट्टीवर धडकण्यास सुरुवात झाली. त्यावेळी हे वादळ किनारपट्टीपासून ३० किमी दूर होते. मात्र, हळूहळू ते जवळ आले आणि पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीला धडकले. रेमल वादळामुळे लाकडाची आणि बांबूची घरे उद्ध्वस्त झाली. वाऱ्याचा वेग इतका होता की झाडेही उन्मळून पडली. अनेक किनारी भागात विजेचे खांबही उन्मळून पडल्याचे दिसून आले. सुंदरबनमधील गोसाबा परिसरात ढिगाऱ्याखाली येऊन एक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दिघा येथील किनारपट्टीवर उंच लाटा उसळताना दिसत आहेत. रेमलमुळे पश्चिम बंगालच्या संपूर्ण किनारपट्टी भागात जोरदार पाऊस झाला आहे.
बांग्लादेशमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसाचा जोर एवढा वाढला की, किनाऱ्यालगत उभ्या असलेल्या बोटी पाण्याने भरल्या. मातीची आणि बांबूची घरे उद्ध्वस्त झाली. किनाऱ्यालगतचे शेत आणि सखल भाग जलमय झाला आहे. घरांची छतं उडाली, विजेचे खांब तुटले आणि अनेक भागात झाडे उन्मळून पडली. कोलकात्याला लागून असलेल्या सखल भागातील रस्ते आणि घरे पाण्याखाली गेली आहेत.
भारतीय हवामान विभागाचे सोमनाथ दत्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेमल चक्रीवादळ धडकल्यामुळे दक्षिण बंगालमध्ये जोरदार वारे आणि पावसाचा प्रभाव दिसून येईल. हवामान विभागाने चिरांग, गोलपारा, बक्सा, दिमा हासाओ, कचार, हैलाकांडी आणि करीमगंज जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तर धुबरी, दक्षिण सलमारा, बोंगाईगाव, बजाली, तामुलपूर, बारपेटा, नलबारी, मोरीगाव, नागाव, होजई आणि पश्चिम कार्बी जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…