
मुंबई: महाराष्ट्र राज्य महामंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या दहावी बोर्डाचा निकाल आज जाहीर होत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे ते विद्यार्थी महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल चेक करू शकतात.
येथे तपासा १०वीचा निकाल
महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तुम्ही यापैकी कोणत्याही एका वेबसाईटवर निकाल चेक करू शकता
mahresult.nic.in
mahahsscboard.in
results.digilocker.gov.in
results.gov.in.
या तारखेला झाली होती परीक्षा
महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीची परीक्षा १ मार्च ते २६ मार्च २०२४ दरम्यान झाली होती. आज निकाल जाहीर झाल्यानंतर निकालाची गुणपडताळणी २८ मे पासून सुरू होईल आणि ११ जून पर्यंत राहील.
२०२३मध्ये महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी परीक्षेचा निकाल एकूण ९३.८३ टक्के इतका लागला होता. मुलींनी या निकालात बाजी मारली होती. गेल्या वर्षी दहावीत एकूण ९५.८७ टक्के मुली आणि ९२.०६ टक्के मुलांनी परीक्षा पास केली होती.