pre wedding : बॉलिवू़डचे व-हाड निघालंय इटलीला!

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगसाठी आलिया-रणबीर ते सलमान-धोनीपर्यंत अनेक दिग्गज मंडळी हजेरी लावणार


एकच चर्चा! प्री-वेडिंगला कोणकोण बॉलिवूड सेलिब्रिटी परफॉर्म करणार?


मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. जुलै महिन्यात त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. त्याआधी मार्च महिन्यापासून त्यांच्या प्री-वेडिंगला (pre wedding) सुरुवात झाली आहे. गुजरातमधील जामनगरमध्ये मार्च महिन्यात तीन दिवस ग्रँड प्री-वेडिंग पार पडल्यानंतर आता पुन्हा एकदा अनंत-राधिका दुसऱ्यांदा प्री-वेडिंग फंक्शन इटलीतील क्रूजवर करायला सज्ज झाले आहेत. अनंत-राधिकाच्या या क्रूज पार्टीसाठी बॉलिवूडदेखील पुढील काही दिवसांसाठी बंद असणार आहे. सलमान खानपासून (Salman Khan) आलिया भट्ट (Alia Bhatt) ते रणबीर कपूरपर्यंत (Ranbir Kapoor) अनेक दिग्गज कलाकार या कार्यक्रमासाठी इटलीला रवाना झाले आहेत.



एअरपोर्टवर सर्वात आधी रणबीर कपूर, आलिया भट्ट आपली लेक राहासोबत स्पॉट झाले. आलिया आणि रणबीर अंबानींच्या प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावत असतात. यंदा अनंत-राधिकाच्या सेकंड प्री-वेडिंगला ते लेक राहासोबत हजेरी लावणार आहेत. रणबीर, आलिया आणि राहासोबत 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाचे दिग्दर्शक आणि त्याचे खास मित्र अयान मुखर्जीदेखील दिसून आले. बॉलिवूडच्या सर्व कलाकारांना मुंबईतील एका प्रायव्हेट एअरपोर्टवर इटलीला जाण्याआधी स्पॉट करण्यात आले.


मीडिया रिपोर्टनुसार, अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचे दुसरे प्री-वेडिंग २८ ते ३० मे दरम्यान पार पडणार आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानदेखील (Salman Khan) या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे. सलमानलादेखील एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले.


क्रिकेटर एमएस धोनी आपली लेक जीवा आणि पत्नी साक्षी धोनीसह अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगला रवाना झाला आहे. रणवीर सिंहदेखील (Ranveer Singh) रवाना झाला आहे.


अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगसाठी सध्या प्रत्येकजण उत्सुक आहे. याआधी गुजरातमध्ये झालेल्या पहिल्या प्री-वेडिंग फंक्शनला आंतरराष्ट्रीय गायिका रेहानासह दिलजीत दोसांझ, सलमान, शाहरुख आणि आमिर खानसह अनेक कलाकार सहभागी झाले होते. आता अनंत-राधिकाच्या प्रे-वेडिंगला शकीराचा परफॉर्मन्स असू शकतो, असे म्हटले जात आहे. तसेच बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील प्री-वेडिंगला परफॉर्म करताना दिसतील.

Comments
Add Comment

'क्योंकि सास भी कभी बहू थी' २ मध्ये झळकणार बिल गेट्स

मुंबई : २००० ते २००८ च्या कालावधीत घराघरात पोहोचलेली हिंदी मालिका म्हणजेच 'क्योंकि सास भी कभी बहू थी' ही मालिका आता

सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची फाईल पुन्हा उघडणार?

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्युप्रकरणाला आता तब्बल चार वर्षांहून अधिक काळ उलटला असला तरी या

रितेश देशमुखने शब्द पाळला; पाठपुरावा करुन मृत ज्युनियर आर्टिस्टच्या कुटुंबाला केली लाखमोलाची मदत!

मुंबई : 'राजा शिवाजी' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान साताऱ्याजवळ कृष्णा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झालेल्या सौरभ

The Ganeshutsav Podcast : 'The Ganeshutsav Podcast' (TGP) चा डंका! चिराग चंद्रकांत खिलारे यांनी जगातील पहिले 'हिंदू उत्सव' पॉडकास्ट सुरू करून मूर्तिकारांना दिले व्यासपीठ

मुंबई : भारतातील समृद्ध उत्सव संस्कृतीला जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी १७ जुलै २०२४ रोजी 'TGP (The Ganeshutsav Podcast)' या विशेष

"मला कधी लग्न करायचं नव्हतं पण..." पॉलाच्या एका मेसेजनं बदललं सारंगचं आयुष्य

पुणे : भारतीय डिजिटल पार्टी (भाडिपा) या लोकप्रिय मराठी यू ट्यूब चॅनलचा संस्थापक आणि अभिनेता सारंग साठे याने

Booby Deol : "नर्व्हस झालो, अक्षरशः घाम फुटलेला!"- 'आश्रम 3' मधील बोल्ड सीनबद्दल बॉबी देओलचा खुलासा; चाहत्यांना धक्का!

बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल (Bobby Deol) सध्या त्याच्या अभिनय कारकिर्दीच्या सर्वोच्च शिखरावर आहे. ऐन तारुण्यात