सासुरवाशीण स्त्रीला आयुष्यात सुगीचे दिवस आणणारं माहेर! अत्यानंद देणारं माहेर! आनंद, ऊर्जाशक्ती, प्रेमळ, साथ आणि टॉनिक देणारं. मनाची हूरहूर, ओढ, जिव्हाळा, आपुलकी व्यक्त होण्याचं हक्काचे ठिकाण. हवं हवं असं वाटणारं, आनंद लुटणारं, लाड-हट्ट पुरवणारं, हवं ते हवं तेव्हा आपलेपणा देणारं, अधिकार, हक्काचं कोडकौतुक देणारं, मान उंचावणारं आणि शान राहणार. प्रसंगी मान-मरातब, जरब, अदब सारं काही मुक्तहस्ते सुखाची उधळण देणारं. भाग्यवान समजतात, मनोमनी आपण जेव्हा माहेरसाठी आनंदासाठी. माहेरच्या सुख-दुःखात होरफळ ही होते. लग्नापूर्वी प्रत्येक जण २१, २२ वर्षं आपल्या दारात वाढणारं, डवरणारं, हिरवं लुसलुशीत गोंडस रोपट अचानक जेव्हा दुसऱ्यादारी नवे या अंगणातून त्या अंगणात अंगणात जातं आणि रुजू लागतं तेव्हा माहेरचं नाव, गाव, माणसं, आवड-निवड सोडून फक्त लग्न नावाच्या संस्कार पद्धतीने विवाह नात्याने कायमस्वरूपी तिकडचं होऊन जातं.
कसं असतं बाई आयुष्य? नाव गाव विसरून जाते, सासरचीच होऊन! मनात वादळी पेलताना पुन्हा नव्याने… कितीदा तरी पडते, झडते, उठते, लढते, कोलमडते, पण पुन्हा नव्यानेच जोमानं उभी राहते आणि उभा करते एक स्वर्ग न डगमगता स्वीकारते आव्हाने, सासरचं वैभव जीवापाड जपते, उंबरठ्यावरचे माप कर्तव्याने भरते, समृद्धीच्या रांगोळी तृप्तीचे रंग भरते, सौख्याचा निरंजन देवघरात तेवत उंबरठ्यावर नंदादीप. तिची तृप्ती तिच्या माणसात शोधते. त्यांच्यात सुख, मानापान, आवड-निवड, सारं समर्पण तिथेच असते. माहेरी असते ती पाहुणी! चार दिवसांची, चार गोडधोड मायेचे घास, चार भेटीगाठी, चार शब्दांची फुंकर.
सारं काही मायेच्या पदराच्या ओटीतच घेऊन जाते सासरी. त्यात असते आईची माया, पित्याची छत्रछाया, बंधुप्रेमाचे रक्षण, बहिणीचा औक्षण, वहिनीचा पाहुणचार, सासुरवाशिणीला माहेर असतं स्वप्नझुला. सदा प्रकाश वाट दिव्यांची, मायेचा ओलावा, पारिजातकाचा सडा, सोनचाफ्याचा सुगंधी क्षण, बकुळीचा ताटवा, जाई-जुईची वेल, श्रावणाचा गारवा, माहेरचा नित्य अनुभव नवा. संसाराच्या रामारेटात विसावण्याची, हक्काची, मायेची जागा ऊब मिळणारी, रुसवा-फुगवा काढणार, लाडाचं कोडकौतुक करणार, नातं निभवणारं असतं माहेर! आपुलकीतील ओढ असते मनी कायम. आयुष्यातील प्रत्येक टप्प्याटप्प्याला मागे वळून पाहताना, मनोमन सुखावणं, समर्पण करणारे आणि संस्मरण देणारं. माहेरी सारा जीव गुंततोच ना. आईला निरोप देताना खूप सारं असलं, तरी माहेर सोडताना सर्वात आधी मला कळव, आवर्जून सांगताना आळवतो सूर. तो सूर नवं काही आलं घरी तर दाखवावं तुला घेऊन जा. आईने बोलावं दाटून स्वर, हट्ट पुरवत वडिलांनी देतानाच आणखी हवं तेव्हा सांग. देईन मी तुला दाटून कंठ असं भावाने बोलावं. माहेर असतं नंदनवन!
मनोमनीच प्रत्येक फूल जिथे उमलतं. फुलतं चैतन्य देतं. तेच आनंद देऊन जातं. प्रसन्न करतं तेच असतं माहेर! सर्वोच्च आनंदसेतू अविस्मरणीय, ग्रेट! बंधू येईल न्यायला गौरी-गणपतीच्या सणाला. सणवार-उत्सवात गौरी-गणपती, नागपंचमी, रक्षाबंधन, दिवाळी या सणांना भाऊ मुराळी येतो, सासुरवाशिणीला सासरी न्यायला येतो.
संत कवयित्री बहिणाबाई माहेरचे गुणगान गाणाऱ्या कवितेमध्ये म्हणतात, तेव्हा वाटेतल्या गोसाव्याला प्रश्न पडतो की,
माझं माहेर माहेर
सदा गाणं तुझ्या ओठी
मग माहेरून आली
सासराले कशासाठी? यावर बहिणाई उत्तर देते,
“देरे देरे योग्या ध्यान
ऐक काय मी सांगते! लेकीच्या माहेरासाठी
माय सासरी नांदते! वर्षानुवर्ष आपली आई मुलीला माहेर मिळावं, यासाठी सासरी असते. सासरहून माहेराला जाताना दगड, गोटा, ठेचा लागल्या तरी तिला पर्वा नसते.
“माझ्या माहेराच्या वाटे,
जरी लागल्या रे ठेचा. वाटेवरल्या दगडा तुले,
फुटली रे वाचा!”
‘माहेराले जाणं’ या कवितेतून सुंदर माहेराचं मूर्तिमंत उदाहरण माझी बहिणाई देते. नागपंचमीच्या सणाला सासुरवाशिणी महिला फेराची मंगळागौरची गाणी म्हणत, त्यात नाही का एक गाणं होतं, ‘असं माहेर सुरेख बाई’ खरंच प्रत्येकीला आपलं माहेर सुरेख आणि स्वर्ग वाटतं.
घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात
माहेरीच्या सुवासाची कर बरसात…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…
महिलांना त्यांच्या पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अँकलेट परिधान करायला फार आवडते. विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलींनाही अँकलेट…
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…
बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…