Sanjay Shirsat : शरद पवार गटात असंतोष माजला आहे; ४ जूनला आघाडी साफ होईल!

संजय राऊतांच्या दाव्यावरुन शिवसेना नेते संजय शिरसाट यांचा हल्लाबोल


मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे नेहमी आपल्या कोणत्या ना कोणत्या वक्तव्यामुळे अडचणीत सापडतात. आता पुन्हा एकदा त्यांच्या नव्या वक्तव्यामुळे ते वादात सापडले आहेत. 'लोकसभा निवडणुकीत अजित पवार (Ajit Pawar) गटाचा एकही उमेदवार निवडून येऊ नये, यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेची यंत्रणा काम करत होती', असा दावा संजय राऊत यांनी केला. यावर शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी जोरदार पलटवार केला आहे. तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात असंतोष आहे, असा मोठा दावाही शिरसाट यांनी केला.


संजय शिरसाट म्हणाले की, "संजय राऊत यांना आता काही कामे राहिली नाहीत. त्यांना आता काही स्फोटक वक्तव्यं करायची आहेत, म्हणून ते करतात. अजित पवारांचे उमेदवार पाडायचे काय कारण आहे? त्यांचे पाच उमेदवार होते, शिरूरच्या जागेवरती उमेदवार आमच्या कडचा दिला आहे. सगळ्यात जास्त सभा मुख्यमंत्र्यांनी या पाचही मतदार संघात केल्या आहेत," असा पलटवार संजय शिरसाट यांनी केला.


तसेच "राष्ट्रवादी शरद पवार गटात असंतोष माजला आहे. सुप्रिया सुळे व रोहित पवार यांची हुकुमशाही सुरु आहे. ज्यांनी शरद पवारांसोबत कामं केली आहेत, ते आता रोहित पवारांचं ऐकतील का? तिकडे गोंधळाची स्थिती आहे. रोहित पवार आणि सुप्रिया सुळेंना सर्व वैतागले आहेत. प्रदेशाध्यक्ष एक पाऊल टाकून आहेत. ते कधी येतील सांगता येत नाही." तसेच ४ तारखेला आघाडी साफ झालेली दिसेल. ४ जूननंतर वर्षावर वारे वाहतील, असा खळबळजनक दावाही शिरसाट यांनी केला.

Comments
Add Comment

आरटीओ कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण अटळ

मुंबई : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आकृतीबंधाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करावी. सर्व रिक्त पदांवर

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

'आयुष'च्या ४२८५ रिक्त जागा, होमिओपथी, आयुर्वेद, युनानी अभ्यासक्रमांचे प्रवेश

महाराष्ट्र : आरोग्यविज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सरकारी आणि खासगी महाविद्यालयांकडून राबवण्यात

शिक्षक होण्याची सुवर्णसंधी, CTETची अधिसूचना जाहीर

मुंबई : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार केंद्रीय शिक्षक पात्रता

उत्तम आरोग्यासाठी महापालिका आयुक्तांनी केल्या अशा सूचना

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईकरांनी आपल्या उत्तम आरोग्यासाठी उद्यानात आणि व्यायामशाळेत श्रम घेणे गरजेचे आहे.