Pravin Darekar : ४ जूननंतर संजय राऊतांचं फुटलेलं थोबाड दिसेल!

संजय राऊत भ्रमिष्ट झाल्याने काहीतरी काढून प्रसिद्धीत राहण्याचा प्रयत्न करतात


प्रवीण दरेकरांची घणाघाती टीका


मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे नेहमी आपल्या कोणत्या ना कोणत्या वक्तव्यामुळे अडचणीत सापडतात. त्यांनी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) या भाजप नेत्यांवर आरोप करत एक नवा दावा केला. या नेत्यांनी नागपुरात नितीन गडकरींच्या (Nitin Gadkari) पराभवाचा कट रचला होता, असं ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपकडून टीकेची झोड उठली आहे. भाजपा नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनीदेखील संजय राऊतांना तिखट शब्दांत फटकारलं आहे. '४ जूननंतर संजय राऊतांचं फुटलेलं थोबाड दिसेल', असा घणाघात त्यांनी केला आहे.


प्रवीण दरेकर म्हणाले की, "४ जूननंतर संजय राऊतांचं थोबाड फुटलेलं आपल्याला दिसेल. कारण देशाची गरज मोदी आहेत, देशाच्या भविष्यासाठी मोदींची गरज आहे, हे योगी आदित्यनाथ यांनी जाहीर सभांमधून अगदी ठणकावून सांगितलं आहे. त्यामुळे मोदी-योगी असं चित्र उभं करू नका. संजय राऊत तुम्ही आपल्या पक्षाची, आपल्या घराची काळजी करा. हा देश, आमचा पक्ष मोदींच्या नेतृत्वाखाली चालेल, हे सर्वश्रुत आहे. संजय राऊत भ्रमिष्ट झाले आहेत म्हणून अशा प्रकारचं शोधून शोधून, काहीतरी काढून प्रसिद्धीत राहण्याचा आणि नौटंकी करण्याचा प्रयत्न करतात."


पुढे ते म्हणाले, "सामनाच्या दाव्याला आम्ही काडीमात्र किंमत देत नाही. गडकरींच्या संदर्भातलं वक्तव्य म्हणजे, संजय राऊतांचा मूर्खपणाचा कळस. कारण प्रचारात राज्यभर व्यस्त असतानासुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी विजय आणखी भक्कम व्हावा, यासाठी काय योगदान दिलं आहे ते नागपूरवासियांना माहीत आहे. संजय राऊत यांची दुटप्पी भूमिका आहे. अगोदर बोलायचं विरोधात रसद पुरवली, नंतर बोलायचं प्रचारात उतरले, संजय राऊत टीका करताना सुद्धा काय नेमकं बोलायचंय, हे निश्चित करून घ्या.", असं प्रविण दरेकर म्हणाले आहेत.

Comments
Add Comment

आरटीओ कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण अटळ

मुंबई : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आकृतीबंधाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करावी. सर्व रिक्त पदांवर

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

'आयुष'च्या ४२८५ रिक्त जागा, होमिओपथी, आयुर्वेद, युनानी अभ्यासक्रमांचे प्रवेश

महाराष्ट्र : आरोग्यविज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सरकारी आणि खासगी महाविद्यालयांकडून राबवण्यात

शिक्षक होण्याची सुवर्णसंधी, CTETची अधिसूचना जाहीर

मुंबई : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार केंद्रीय शिक्षक पात्रता

उत्तम आरोग्यासाठी महापालिका आयुक्तांनी केल्या अशा सूचना

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईकरांनी आपल्या उत्तम आरोग्यासाठी उद्यानात आणि व्यायामशाळेत श्रम घेणे गरजेचे आहे.