मुंबई: जेव्हा शरीराला गरजेच्या हिशेबाने पाणी मिळत नाही तेव्हा शरीरात पाण्याची कमतरता भासू लागते आणि डिहायड्रेशनचा त्रास होऊ लागतो. अनेक लोकांच्या मते जेव्हा खूप तहान लागते तेव्हा शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ लागते. शरीरात पाण्याची कमतरता असल्यास कोणकोणते त्रास जाणवतात हे जाणून घ्या.
सतत डोकेदुखी
जर तुम्हाला सतत डोकेदुखीचा त्रास सतावत आहे तर शरीरात पाण्याची कमतरता असू शकते. पाण्याची कमतरता असल्याने शरीर असे काही संकेत देते. यावेळेस डिहायड्रेशनमळे मेंदूला ब्लड फ्लो आणि ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो.
खाण्याचे क्रेव्हिंग
डिहायड्रेशनच्या स्थिती अनेक जण भूक आणि तहान यातील फरक विसरून जातात. यामुळे अधिक खाल्ले जाते. या स्थिती गळा सुकू लागतो.
तोंडातून दुर्गंधी
पाण्याच्या कमतरतेमुळे तोंडातून दुर्गंधी येऊ लागते. कमी पाणी प्यालल्याने घसा सुकू लागतो. यामुळे तोंडात बॅक्टेरिया वाढतात.
निस्तेज त्वचा
शरीरात पाण्याची कमतरता असल्यास त्वचा रुक्ष होऊ लागते. तसेच त्वचेवर सुरकुत्या येऊ लागतात. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होऊ लागते.
बद्धकोष्ठतेचा त्रास
पाणी पुरेसे प्यायले नाही तर बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवू लागतो. यामुळे पोट साफ होण्यास मदत होते.