मुंबई : जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगलबाबत (Google) एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. जिओनंतर गुगलने आणखी एका नव्या क्षेत्रात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात विस्तार करण्याच्या पार्श्वभूमीवर गुगलकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गुंतवणूक करणाऱ्या क्षेत्रालाही या गोष्टीचा चांगलाच फायदा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ई- कॉमर्स क्षेत्रातील सर्वांत प्रसिद्ध कंपन्यांपैकी एक असलेल्या फ्लिपकार्ट (Flipcart) या कंपनीमध्ये गुगल गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. फ्लिपकार्ट कंपनी वॉलमार्ट कंपनीची उपकंपनी आहे. या फ्लिपकार्ट कंपनीचा काही हिस्सा खरेदी करण्याचा प्रस्ताव गुगलने ठेवला आहे. छोटी हिस्सेदारी खरेदी करून जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न गुगलकडून केला जात आहे. हा करार पूर्णत्त्वास गेल्यास गुगल अॅमेझॉनलाही (Amazon) ला टक्कर देणार आहे.
गुगल फ्लिपकार्टमध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. ही गुंतवणूक साधारण ३५ कोटी डॉलर्स म्हणजेच २,९०० कोटी रुपयांची असू शकते. याबाबतची माहिती सध्या प्राथमिक स्तरावर असून लवकरच यावर ठोस निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
गुगलने ही गुंतवणूक केल्यास फ्लिपकार्टला क्लाऊट प्रोग्रॅमच्या माध्यमातून आपला व्यवसाय वाढवता येईल. तसेच भारतातील संपूर्ण ग्राहकांना सेवा देण्यासाठी डिजिटल इन्फ्रा स्ट्रक्चर देखील मजबूत करता येणार आहे.
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…