Cannes 2024 : ‘ऑल वुई इमॅजिन अ‍ॅज लाईट’ने रचला इतिहास; भारताला ३० वर्षांनंतर मिळवून दिला 'ग्रँड प्रिक्स' पुरस्कार!

चित्रपटातील मराठमोळ्या छाया कदमचं सर्व स्तरांतून कौतुक


पॅरिस : जगातील मोठ्या फिल्म फेस्टिव्हल्सपैकी एक अशा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये (Cannes film festival) यंदा भारतीय चित्रपटांचा (Indian Films) डंका वाजत आहे. भारतातील अनेक चित्रपटांना यात विविध श्रेणींमध्ये नामांकने मिळाली असून ही भारतासाठी अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. मराठमोळी अभिनेत्री छाया कदम (Chhaya Kadam) हिच्या ‘ऑल वुई इमॅजिन अ‍ॅज लाईट’ (All we imagine as light) या सिनेमाला कान्समध्ये उपस्थित मान्यवर व प्रेक्षकांकडून स्टँडिंग ओव्हेशन मिळालं. त्यामुळे छायाचं सर्वच स्तरांतून भरभरुन कौतुक होत आहे. यानंतर या चित्रपटाने पुन्हा एकदा भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.


‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ या चित्रपटाचं स्क्रीनिंग नुकतंच कान्स सोहळ्यात पार पडलं होतं. या भारतीय चित्रपटाला कान्समध्ये भरभरून प्रेम मिळालं. यानंतर चित्रपट महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी पायल कपाडियाच्या या चित्रपटाचा दबदबा पाहायला मिळाला. या चित्रपटाने महोत्सवात ऐतिहासिक कामगिरी करत ‘ग्रँड प्रिक्स’ पुरस्कारावर (Grand Prix Award) आपलं नाव कोरलं आहे. पाल्मे डी’ओर नंतर ‘ग्रँड प्रिक्स’ हा चित्रपट महोत्सवातील दुसरा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार आहे.


‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’चा प्रीमियर २३ मे रोजी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये करण्यात आला. गेल्या ३० वर्षांत महोत्सवाच्या मुख्य विभागात प्रदर्शित होणारा हा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. १९९४ मध्ये शाजी एन करुण यांचा ‘स्वाहम’ हा कान्सच्या मुख्य विभागात पोहोचणारा शेवटचा भारतीय चित्रपट होता.


पायल कपाडिया दिग्दर्शित ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ या चित्रपटात कानी कुसरुती, दिव्या प्रभा, छाया कदम आणि हृदयू हारून यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पायल कपाडिया लिखित ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ ही केरळमधील दोन नर्सेसची कथा आहे. कथेच्या केंद्रस्थानी नर्स प्रभा आहे, तिची भूमिका कानी कुसरुतीने साकारली आहे. दरम्यान, मराठमोळ्या छाया कदम या चित्रपटाचा भाग असल्याने सध्या मराठी कलाविश्वातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. याशिवाय यंदा पाल्मे डी’ओर पुरस्कारावर ‘अनोरा’ चित्रपटाने आपलं नाव कोरलं आहे.

Comments
Add Comment

भारताला सागरी रोजगाराचे जागतिक केंद्र बनवणार!

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी व्यक्त केला इंडिया मेरीटाईम वीकमध्ये विश्वास नवी दिल्ली : केंद्रीय

बिहार निवडणूक 2025 : फिलोदी सट्टा बाजारानं निवडणुकीच्या निकालाविषयी केलं भाकीत

पाटणा : बिहारमध्ये निवडणुकीचं तापमान चढलं असलं तरी सगळ्यांची नजर आता राजस्थानच्या प्रसिद्ध फिलोदी सट्टा

महामार्गांवर असणार आता ठेकेदारांच नाव आणि पत्ताही

नवी दिल्ली : आता प्रत्येक महामार्गाच्या सर्व एन्ट्री पॉइंटवर सहज दिसेल असा मोठा फलक लावला जाईल. या फलकावर संबंधित

Ayodhya Ram Mandir : २५ नोव्हेंबरला राम मंदिरात भाविकांसाठी 'नो एन्ट्री'! अयोध्या सोहळ्यासाठी ८ हजार निमंत्रणे; PM मोदी उपस्थित राहणार!

नवी दिल्ली : अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिराचे (Ram Janmabhoomi Temple) अपूर्ण राहिलेले काम अलीकडेच पूर्ण झाल्याची घोषणा

लग्नात नववधूने फक्त तीनच सोन्याचे दागिने परिधान करावे, पंचायतीचे निर्देश

उत्तराखंड : दिवसेंदिवस सोन्याच्या आणि चांदीच्या किमती या गगनाला भिडत आहेत. भारतीय परंपरेनुसार आपण बहुतेक

बंगळुरूतील धक्कादायक घटना, जोडप्याने भरधाव वेगाने पाठलाग केला आणि...

बंगळुरू : कर्नाटकमध्ये बंगळुरू येथे एक धक्कादायक घटना घडली. रस्त्यावरुन वेगाने जात असलेल्या एका कारला एका