Deccan Queen : यंदा 'डेक्कन क्वीन'चा वाढदिवस रद्द? काय आहे कारण?

पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांचेही होणार हाल


पुणे : १ जून १९३० रोजी सुरू झालेला ‘डेक्कन क्वीन’चा (Deccan Queen) प्रवास आजही अव्याहतपणे सुरू असून मुंबई-पुणे (Mumbai-Pune) प्रवास करणाऱ्या प्रवाशांची ती आजही पहिली पसंती आहे. पुणे-मुंबई या महत्त्वाच्या शहरांना जोडण्यासाठी रेल्वे रुळावर धावणारी ही पहिली डिलक्स रेल्वे होती. या दख्खनच्या राणीचा दरवर्षी १ जून रोजी मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात येतो. आपल्या घरातील कार्यक्रम असल्याप्रमाणे प्रवासी या कार्यक्रमात सहभाग घेतात. यावर्षी डेक्कन क्वीनला सुरू होऊन ९७ वर्ष पूर्ण होणार आहेत. मात्र यंदा या राणीचा वाढदिवस हुकण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून प्रवाशांनीही नाराजीचा सूर मारला आहे. जाणून घ्या नेमकं कारण काय.



विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (CSMT) प्लॅटफॉर्मचे विस्तारिकरणाचे काम सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसएमटीवरील प्लॅटफॉर्म क्रमांक १० व ११ च्या विस्तारासाठी मध्य रेल्वेकडून (Central Railway) विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक (Power Block) घेण्यात येणार आहे. यामध्ये अभियांत्रिकी विद्युतीकरणासंबंधित इंटरलॉकिंग कामे पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे लोकल (Local) आणि मेल- एक्स्प्रेसच्या (Express) वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.


भायखळा ते सीएसएमटीदरम्यान घेण्यात येणाऱ्या या ब्लॉकमुळे २८ ते ३१ मेदरम्यान अनेक मेल-एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुण्यावरून मुंबईला जाणारी प्रगती एक्स्प्रेस, डेक्कन एक्स्प्रेसचा समावेश असणार आहे. गाड्या रद्द करण्यात आल्याने पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचे देखील हाल होणार आहेत.



कोणत्या ट्रेन रद्द?



  • सीएसएमटी-पुणे प्रगती एक्स्प्रेस (२८ मे ते २ जून)

  • पुणे-सीएसएमटी इंटरसिटी एक्स्प्रेस (३१ मे ते २ जून)

  • नांदेड- सीएसएमटी तपोवन एक्स्प्रेस (१ आणि २ जून)

  • साईनगर शिर्डी-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस (१ आणि २ जून)

  • डेक्कन क्वीन (१ आणि २ जून)


दरम्यान, विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकमध्ये मुंबई-पुणे इंटरसिटी, प्रगती एक्स्प्रेस चार दिवस रद्द राहणार आहे. तर १ आणि २ जून रोजी ‘डेक्कन क्वीन’ रद्द करण्यात आल्याने यंदाचा वाढदिवस रद्द होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

"शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचेपर्यंत आमचा प्रयत्न सुरूच राहील" : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दुष्काळमुक्तच नाही तर, हरित माणदेशाच्या दिशेने मार्गक्रमण! सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज फलटण,

पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेला प्रारंभ, २४ तास दर्शनाची सुविधा!

पंढरपूर : पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भक्तीच्या

नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलेले मराठवाड्याचे प्राध्यापक येताना पत्नीसह भीषण अपघात दगावले...

पुणे : छत्रपती संभाजीनगरातील पडेगाव परिसरात शनिवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात विद्यापीठाचे निवृत्त

पिंपरीत भाजप स्वबळावर लढणार

भाजप-अजित पवार गट आमने-सामने पिंपरी : महायुती सरकारमध्ये सहभागी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे

डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचा फलटण दौरा

सातारा: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना अटक झाली आहे.

रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार: फडणवीस

नाशिक : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन