Vidhan parishad Elections : विधानपरिषदेच्या ४ जागांसाठी निवडणुका जाहीर; कधी होणार मतदान?

पुढे ढकलण्यात आली होती निवडणूक... आता कसं असणार नवं वेळापत्रक?


मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) धामधुमीतच महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या (Vidhan parishad) ४ जागांसाठी निवडणुकांचा घाट घालण्यात आला होता. १० जून या दिवशी यासाठी मतदान होणार होते. मात्र, एका कारणास्तव या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या. यानंतर आता या निवडणुकांच्या तारखा पुन्हा जाहीर करण्यात आल्या आहेत. नव्या निवडणूक वेळापत्रकानुसार, २६ जून रोजी मतदान पार पडणार आहे, तर १ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.


विधानपरिषदेच्या चार जागांमध्ये दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदारसंघांसाठी ही निवडणूक होत आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघ, तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदार संघात ही निवडणूक होणार आहे. ७ जुलै २०२४ रोजी मुंबई पदवीधर मतदारसंघाचे आमदार विलास पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, नाशिक शिक्षक मतदारसंघाचे आमदार किशोर दराडे तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार कपिल पाटील यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे या चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.



कसा असेल निवडणुकीचा कार्यक्रम?


चार जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रकिया ३१ मे रोजी सुरू होणार आहे. तर ७ जून हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असणार आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर १० जून रोजी अर्जांची छाणणी केली जाणार आहे. तसेच अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख १२ जून आहे. प्रत्यक्ष मतदान हे २६ जून रोजी होणार आहे, तर १ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.



का पुढे ढकलली होती निवडणूक?


महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने २ मे ते १४ जूनपर्यंत सुट्टीचा कालावधी जाहीर केला असून शाळा १५ जून नंतर सुरु होणार आहेत. तसेच १७ जून ते २० जून पर्यंत बकरी ईद निमित्त उर्दू माध्यमांच्या शाळांना सुट्टी असणार आहे. मुंबईतील शिक्षक पदवीधर मतदार संघातील उत्तर भारतीय शिक्षक टिचर्स स्पेशल ट्रेनने ११ जून २०२४ रोजी मुंबईत परतणार आहेत. तसेच महाराष्ट्रातील अनेक शिक्षक सुट्टी कालावधीत मूळ गावी किंवा कुटुंबासह पर्यटनासाठी बाहेरगावी गेले आहेत. त्यामुळे मतदानावर त्याचा परिणाम पडू शकतो, असा शिक्षक संघटनांचा दावा होता. उपरोक्त सर्व बाबींचा विचार करुन ही निवडणूक पुढे ढकलली होती.

Comments
Add Comment

सुशोभिकरणाच्या कामांसाठी पुन्हा प्रशासनाने केला हात ढिला

माटुंगा,वडाळ्यातील कामांसाठी प्रलंबित बिलांचा मार्ग मोकळा मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेने हाती

मुंबई महापालिकेत ढाकणे आले, सैनी गेले

अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांची नियुक्ती मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ अमित

तक्रार येईपर्यंत थांबू नका, मतदारयादीतील चुका स्वतःहून दुरुस्त करा

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या मतदारयाद्या अचूक असाव्यात, यासाठी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सर्व

तलाठी, तहसीलदारांसह महसूल कर्मचाऱ्यांवर आता दक्षता पथकांचा ‘वॉच’

मुंबई : सर्वसामान्य जनतेला महसूल विभागाप्रती आपलेपणा वाटावा, तसेच कामे गतिमान व्हावी, या उद्देशाने महसूल

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना आता डिजिटल स्वरुपात

मुंबई : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता महाडीबीटी पोर्टलमार्फत थेट ऑनलाईन मिळणार

डिजिटल ७/१२ ला कायदेशीर मान्यता, आता केवळ १५ रुपयांमध्ये मिळणार अधिकृत उतारा

मुंबई : महसूल विभागाच्या भूलेख महाभूमी पोर्टलवरून आता अवघ्या १५ रुपयांत सातबारा उतारा मिळू शकणार आहे. डिजिटल