IPL 2024: सनरायजर्स हैदराबादचा आयपीएलच्या फायनलमध्ये दिमाखात प्रवेश

मुंबई: आयपीएल २०२४च्या फायनलचे दोन संघ अखेर ठरले आहे. दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात सनरायजर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सला ३६ धावांनी हरवत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. हैदराबादने पहिल्यांदा फलंदाजी करताना १७५ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल राजस्थानला २० षटकांत केवळ १३९ धावा करता आल्या.


हैदराबादने पहिल्यांदा खेळताना २० षटकांत ९ बाद १७५ धावा केल्या. त्यानंतर राजस्थानने पॉवरप्लेमध्ये एक बाद ५१ धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर संघ ढेपाळला. राजस्थानला २० षटकांत केवळ १३९ धावाच करता आल्या. हैदराबादसाठी शाहबाज अहदमने ३ आणि अभिषेक शर्माने २ विकेट घेतल्या.


शाहबाजने यशस्वी जायसवाल, रियान पराग आणि आर अश्विनला बाद केले. तर अभिषेकने संजू सॅमसन आणि शिमरॉन हेटमायरला बाद केले. ध्रुव जुरेलने ३५ बॉलमध्ये नाबाद ५६ धावा करत राजस्थानला सामन्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचे प्रयत्न फोल ठरले. जुरेलने आपल्या नाबाद खेळीमध्ये सात चौकार आणि दोन षटकार लगावले.

आधीच कोलकाता नाईट रायडर्सचा संघ आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. आता केकेआर आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात २६ एप्रिलला लढत होणार आहे.

Comments
Add Comment

ॲशेस मालिका : सिडनीच्या मैदानात स्टीव्ह स्मिथची बॅट तळपली

'द वॉल' द्रविडचा विक्रम मोडीत काढून ३७ वे कसोटी शतक पूर्ण सिडनी : ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने

हरमनप्रीतची झेप; दीप्तीचे अव्वल स्थान निसटले!

आयसीसी टी-२० क्रमवारी जाहीर दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मंगळवारी जाहीर केलेल्या ताज्या महिला टी-२०

श्रेयस अय्यर फिटनेस परीक्षेत उत्तीर्ण

विजय हजारे करंडक : मुंबई, कर्नाटक, सौराष्ट्र उपांत्यपूर्व फेरीत दाखल मुंबई : विजय हजारे करंडक २०२५-२६ स्पर्धेच्या

मुस्तफिजूर रहमानसाठी संपूर्ण बांगलादेश वेठीला!

आयपीएल प्रसारणावरील बंदीमुळे क्रिकेटप्रेमींमध्ये संताप नवी दिल्ली : बीसीसीआयने अलीकडेच आयपीएल फ्रँचायझी

आयसीसी टी-२० वर्ल्डकपचे नवीन वेळापत्रक?

भारतात खेळण्यास नकार देऊन बांगलादेशचा बीसीसीआयला दणका नवी दिल्ली : आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ बांगलादेशमुळे

बीसीसीआयच्या आदेशामुळे KKR ने मुस्तफिजूरला सोडल, ९.२० बसणार फटका ?

मुंबई : आयपीएल २०२६ सुरू होण्याआधीच कोलकाता नाईट रायडर्स संघाला मोठा निर्णय घ्यावा लागला आहे. बीसीसीआयच्या