एके दिवशी पहाटे शशीकांत देवळेकर नावाचा स्वामी परम भक्त स्वप्नात विचारू लागला या आधुनिक जगात ईश्वरभक्ती कशी करावी. आपण आम्हास मार्ग दाखवावा. स्वामी पुण्यातिथी दिवशी स्वामी पुन्हा स्वप्नात आले व भक्ताला म्हणाले,भक्ती केल्याशिवाय शक्ती काय आहे हे कधी कळणारच नाही. खूप सुंदर आहे हे भक्तीचं रूप. भक्ती म्हणजे काय असते ते भक्ती केल्याशिवाय कळणार नाही. जो भक्त आपल्या दैवतामध्ये पूर्णपणे विलीन झालेला असतो, एकरूप झालेला असतो, त्याला कसलंही भान नसतं. पण हे सर्वसामान्यांना कळू शकत नाही. हे फक्त त्या देवाला आणि त्याच्या भक्तालाच माहीत असतं. भक्ताचं एक पानही हलत नाही. त्या परमेश्वराशिवाय तो भक्तीमध्ये लीन झालेला असतो, दंग झालेला असतो. त्याच्या अंतरंगात फक्त पांडुरंग रहात असतो आणि डोळ्यासमोर फक्त त्याचा विठ्ठल दिसत असतो. जिकडे बघावं तिकडे त्याचा विठ्ठलच असतो. सगळ्यांमध्ये त्याला तोच दिसत असतो.
‘जे जे भेटे भूत मानीजे’भगवंत अशी त्याची अवस्था असते. राधा व मीरा भक्त श्रेष्ठ आहेतच. तसेच तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वर, रामदास हे सारे भक्त श्रेष्ठ आहेत. कारण भक्ताला एक अवस्था अशी प्राप्त होते की तो पूर्णपणे त्या ईश्वरामध्ये विलीन/एकरूप होऊन जातो. ज्यांना भक्तीचा अनुभव आहे त्यांना या गोष्टी कळतात. वरवर पाहता जरी देह दिसत असेल पण अंतरंगात पूर्णपणे पांडुरंगाचा निवास असतो. त्यामुळे भक्ती करा. भक्ती केल्याने तुम्हाला खूप फायदे होतील असं काहींनी केवळ काहीतरी इच्छापूर्तीसाठी भक्ती करावी. मुळात मनुष्य हा परमेश्वर प्राप्तीसाठीच आहे. हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपल्याकडून खरी भक्ती घडत नाही.
ज्या दिवशी आपणांस कळते खरं तर सुखी लोकांना ही गोष्ट कधीच कळत नाही. पण बहुतेक ज्यांच्या वाट्याला काही दुःख येतात, त्रास येतात ते काहीही कारण नसताना किंवा काही नाईलाजाने भक्तीकडे वळतात. काहींना जन्मतः ओढ असते त्या परमेश्वराची जो कोणी असेल आणि कुठल्याही कारणामुळे भक्ती करत असेल पण भक्तीत पूर्णपणे डुबल्याशिवाय त्याला त्याचा अनुभव येत नाही. एकदा भक्ती मार्गात आल्यावर कोणी, कधी परत मागे फिरले आहे असे आजपर्यंत कधी ऐकले नाही. कारण त्या भक्तीमध्येच इतका गोडवा आहे, मधुरता आहे की, त्याला चोवीस तास अंतरंगात वाहणारा भक्तीच्या सुगंधाची सवय झाली की त्याला तो हवाच असतो. आनंदात असतो. परमेश्वरा व्यतिरिक्त त्याला जगच दिसत नाही. सगळ्यांमध्ये तो त्यालाच शोधतो, त्यालाच पाहतो आणि परमेश्वराशिवाय एक सेकंदही राहत नाही. फार क्वचितच लोकांना हे कळते म्हणून जीवन हे परमेश्वर प्राप्तीसाठी आहे. त्यामुळे परमेश्वराची प्राप्ती झाली नाही या जन्मात तरी भक्तीचा आनंद मिळेलच म्हणून जेवढी होईल तेवढी भगवंताची, सगुणाची भक्ती शुध्द प्रेमाने करा. सदामुखाने स्वामीनाम घ्या. संपूर्ण काम प्रेमाने, ईश्वरी काम समजून प्रेमाने करा. स्वामी तुम्हाला यश देतील. तोंडाने स्वामीनाम, हाताने चांगले काम. स्वामीकाम हाच खरा भक्तीमार्ग. आईवडील, आजी-आजोबा, गरीबांची सेवा म्हणजे स्वामीभक्ती हे विसरू नका.
भक्त पुसे प्रेमळ स्वामी
कशी करावी भक्ती मी ।। १।।
दिनरात आठवावे स्वामी
भक्तीत पडू नये काही कमी।।२।।
मी, देवभक्त ऐकजीव स्वामी
सांगा मला युक्ती नामी ।।३।।
विठ्ठलाची पायरी नामदेव नामी
ज्ञानेश्वराचा रेडा बोले स्वामी।।४।।
सांगा स्वामी अशी भक्ती
अंगात येईल त्वरित शक्ती ।।५।।
स्वामी वदे नको घाबरू भक्त
घे दिनरात स्वामीनामच भक्ता।।६।।
हनुमाने घेतले सदा रामनाम
समुद्रापार घेत उडाला सीताराम।।७।।
ध्रुवबाळ घेतले विष्णू नाम
आकाशात ध्रुवतारा ध्रुवनाम ।।८।।
विभिषण घेलले सदा रामनाम
लंकापती झाला संपवून रावण नाम।।९।।
खांबातून अवतरला नरसिंह अवतार
पोट फाडून संपवला असूरे अवतार ।। १०।।
होळीत मांडीवर घेतला भक्त प्रल्हाद
न जळता विष्णू नामाने केला आल्हाद ।। ११।।
खारीने पूल बांधता घेतले रामनाम
पाठीवरती खूण प्रेमळ रामनाम ।। १२।।
शबरी देई बोरे घेत रामनाम
रामपुण्य वाढले ते रामनाम ।। १३।।
जांभुवन केली अलिखित मदत
रामाची मिठी राहिली गाजत।।१४।।
अंगद वानर बांधला लंकापूल
रामराज्यभिषेके साऱ्या घातली झुल ।।१५।।
१४ वर्षे सांभाळल्या पादुका भरत
अजरामरते बंधुप्रेम राम भरत ।। १६।।
१४ वर्षे रामासह केला वनवास
रामलक्ष्मणा प्राप्त रामाचा सहवास।। १७।।
हनुमाने चावली माळेतली मोती
राममूर्ती फोडून दाखविली स्वःछाती।। १८।।
मुच्छीत लक्ष्मणा वाचविले हनुमान
जगभर झाले नाम राम हनुमान ।। १९।।
वाली ठार मारूनी राम केली मदत
सुग्रीवा करी दिनरात मदत ।। २०।।
जटायू केले युद्ध आमरण
रामनाम घेत रावणा गेला नाही शरण ।। २१।।
घ्या रामनाम स्वामी नाम दत्तनाम
भक्ती दिनरात स्वामी काम व स्वामीनाम ।। २२।।
vilaskhanolkarkardo@gmail.com
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…