एक छोटा तुकडा डार्क चॉकलेट खाण्याचे हे आहेत जबरदस्त फायदे

मुंबई: डार्क चॉकलेटमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यात मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट आणि मिनरल्स असतात. अनेक अभ्यासाअंती हे समोर आले आहे की डार्क चॉकलेटमुळे तुमचे आरोग्य सुधारू शकते. तसेच हृदयरोगाचा धोकाही कमी होतो. आम्ही तुम्हाला डार्क चॉकलेटचे अनेक फायदे सांगत आहोत.


डार्क चॉकलेटमध्ये ११ ग्रॅम फायबर, ६६ टक्के आर्यन, ५७ टक्के मॅग्नेशियम, १९६ टक्के तांबे आणि ८५ टक्के मँगनीज ही पोषकतत्वे असतात जी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. डार्क चॉकलेटमध्ये इतर चॉकलेटच्या तुलनेत कोको अधिक असते आणि साखर कमी असते. यामुळे ती अधिक फायदेशीर ठरते.



फायदे


डार्क चॉकलेटचे सेवन केल्याने हृदयरोगाचा धोका कमी होतो. डार्क चॉकलेटमधील फ्लॅवेनॉल लायकोपीन भरपूर असल्याने डार्क चॉकलेट एकूण कोलेस्ट्रॉल, एलडीएल कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईडचा स्तर कमी करतात.


डार्क चॉकलेटमधील बायोअॅक्टिव्ह यौगिक आपल्या त्वचेसाठी चांगली असतात. यातील फ्लेवनॉस्स सूर्याच्या अतिनील किरणांपासून बचाव करतात.


डार्क चॉकलेटमुळे तणाव कमी होण्यास मदत होते. यामुळे मूड चांगला राहतो. यातील तत्व तणाव निर्माण करणारे कॉर्टिसोल हार्मोन नियंत्रित करतात.

Comments
Add Comment

ऑक्टोबरमध्ये जरूर खा या भाज्या, रहाल निरोगी आणि फिट

मुंबई: ऑक्टोबर महिन्यात थंडीची सुरुवात होत असल्याने (मान्सून ते हिवाळा संक्रमण), या काळात रोगप्रतिकारशक्ती

हिवाळ्यातील सुपरफूड! तीळ खाल्ल्याने हृदय, हाडे आणि त्वचेला मिळतात फायदे. जाणून घ्या जबरदस्त फायदे

तीळ खाण्याचे फायदे जाणून तुम्हाला खरोखर आश्चर्य वाटेल. तीळ केवळ अन्नाची चव वाढवत नाही तर आरोग्यासाठी एक सुपरफूड

दिवाळी आलीये, कमी वेळेत घर करा चकाचक!

मुंबई : सण असो वा रोजची साफसफाई, घर स्वच्छ ठेवल्याने सकारात्मकता आणि उत्साह येतो. बाजारातील महागड्या

मायग्रेन का होतो? आणि त्याचे सुरुवातीची लक्षणे काय आहेत?

मायग्रेन ही एक प्रकारची तीव्र डोकेदुखी आहे जी सामान्य डोकेदुखीपेक्षा वेगळी असते. त्यामुळे डोक्याच्या एका भागात

वारंवार पेनकिलर घेत असाल तर आधी हे वाचा !

मुंबई : थंडीच्या दिवसात हवामानात झपाट्याने होणाऱ्या बदलांचा अनेकांच्या तब्येतीवर परिणाम होतो. अंगदुखी, ताप

झोप न लागण्याची समस्या? या सवयी बदलतील तुमचं आयुष्य!

मुंबई : खरंतर, हल्लीच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे झोपेच्या समस्या खूपच वाढल्या आहेत. चुकीच्या