Election Commission : 'संविधान धोक्यात आहे' अशी वक्तव्यं करु नका!

निवडणूक आयोगाची काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगेंना सूचना


भाजप व काँग्रेसला धार्मिक वक्तव्ये टाळण्याचे दिले आदेश


नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) राज्यातील मतदानाचे सर्व टप्पे पार पडले असून देशभरात मतदानाचे दोन टप्पे बाकी आहेत. यासाठी राजकीय नेत्यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. मात्र या प्रचारादरम्यान, एकमेकांवर टीका करत असतानाच दोन प्रमुख पक्ष म्हणजेच भाजप व काँग्रेस (BJP and Congress) यांच्याकडून धार्मिक वक्तव्ये केली जात आहेत. टीकेची भाषा अत्यंत खालच्या पातळीला गेली आहे. याचं गांभीर्य लक्षात घेत भारतीय निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा दोन्ही पक्षाच्या पक्षाध्यक्षांना धार्मिक वक्तव्ये टाळण्याचे आदेश जारी केले आहेत. तसेच दोन्ही पक्षाध्यक्षांनी आपापल्या पक्षाला याबाबत नोटीस जारी करण्याची सूचना दिली आहे.


निवडणूक प्रचाराचा घसरलेला दर्जा पाहता आयोगाने भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा (J. P. Nadda) आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांना आपापल्या पक्षांच्या स्टार प्रचारकांना अयोग्य विधाने न करण्यासाठी, सावधगिरी बाळगण्यासाठी आणि शिष्टाचारात राहण्यासाठी औपचारिक नोटीस जारी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, जात, समुदाय, भाषा आणि धर्माचे नाव घेऊन प्रचार करु नये, तसेच अग्निवीर योजना आणि भारतीय संरक्षण दलांचे/ भारतीय सैन्याचे राजकारण न करण्याचा सल्ला काँग्रेसच्या स्टार प्रचारक आणि उमेदवारांना दिला आहे. निवडणुकीमुळे भारताच्या सामाजिक-सांस्कृतिक वातावरणावर परिणाम होऊ नये, असेही आयोगाने म्हटले आहे.



निवडणूक आयोगाची मल्लिकार्जुन खरगेंना सूचना


निवडणूक आयोगाने संविधानासंदर्भात मल्लिकार्जुन खरगेंना एक विशेष सूचना दिली आहे. 'संविधान धोक्यात आहे' अशा प्रकारची वक्तव्यं न करण्याचा इशारा खरगेंना देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च

पाचगणी ते महाबळेश्वर, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारताची ७ ठिकाणे झळकली!

महाराष्ट्राचा डंका! नवी दिल्ली : देशातील ७ सुंदर ऐतिहासिक स्थळांची नावे युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा

मतदारयादी सुधारणा हा आयोगाचा विशेषाधिकार

केंद्रीय निवडणूक आयोगाचे सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण नवी दिल्ली : देशभरात वेळोवेळी मतदारयादी सुधारणा करणे

‘ऑपरेशन सिंदूर’वेळी काँग्रेसकडून पाकिस्तानच्या लष्कराची पाठराखण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल गुवाहाटी : काँग्रेस नेहमीच भारतविरोधी शक्तींच्या पाठीशी उभी राहते आणि

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१