
'असा' करा अर्ज; जाणून घ्या सविस्तर माहिती
मुंबई : भारतीय हवाई दलात पायलट होऊ इच्छिणाऱ्या तसेच नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी आनंदाची बातमी मिळत आहे. भारतीय हवाई दलाने एअरमन आणि अग्निवीरनंतर आता आणखी एका नोकर भरतीची अधिसूचना जारी केली आहे. एअर फोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट (AFCAT) या भरतीसाठी हवाई दलाने जाहिरात काढली आहे. फ्लाइंग ब्रँच आणि ग्राउंड ड्युटी शाखेतील एक दोन नव्हे तर चक्क ३०४ रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक व पात्र उमेदवारांसाठी भरघोस पगाराची ही मोठी संधी असणार आहे.
AFCAT साठी शैक्षणिक पात्रता-
- फ्लाइंग ब्रांच पदासाठी अर्जदार ५० टक्के गुणांसह बारावी विज्ञान शाखेतून (गणित आणि भौतिकशास्त्र) उत्तीर्ण असावा. यासोबतच BE/B.Tech मध्ये ६०% गुण आवश्यक आहेत.
- ग्राउंड ड्युटी (तांत्रिक) शाखा- यासाठी देखील १२ वी विज्ञान शाखेत (गणित आणि भौतिकशास्त्र) ५०% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच BE/B.Tech ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) शाखा – विज्ञान शाखेत (गणित आणि भौतिकशास्त्र) ५०% गुणांसह १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, ६०% गुणांसह कोणत्याही प्रवाहातून पदवीधर असायला हवे.
भारतीय हवाई दल वयोमर्यादा-
भारतीय वायुसेनेच्या फ्लाइंग ब्रँचमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २० ते २४ वर्षे आणि ग्राउंड ड्युटी शाखेसाठी २० ते २६ वर्षांच्या दरम्यान असावे.
निवड प्रक्रिया-
भारतीय हवाई दल AFCAT 2024 च्या निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा, हवाई दल निवड मंडळ (AFSB) मुलाखत आणि वैद्यकीय चाचणी यांचा समावेश होतो. AFCAT लेखी परीक्षा ३०० गुणांची असते. दोन तास चालणाऱ्या या परीक्षेत १०० प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नासाठी उमेदवाराला ३ गुण मिळतात. तसेच परीक्षेत निगेटिव्ह मार्किंगही असेल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १ गुण वजा केला जाईल.
भारतीय हवाई दल अर्ज शुल्क-
भारतीय हवाई दल मध्ये भरती होण्यासाठी सर्व उमेदवारांना ५५० रुपये आणि जीएसटी असे अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे लागणार आहे. हे अर्ज शुल्क नॉन रिफंडेबल असणार आहे. एकदा अर्ज शुल्क भरल्यास ते परत केले जाणार नाही.
अर्ज कसा करावा-
- सर्वप्रथम उमेदवाराला AFCAT वेबसाइट afcat.cdac.in वर जावे लागेल.
- मुख्यपृष्ठावर दिसणाऱ्या IAF AFCAT 2 2024 लिंकवर क्लिक करावे लागेल.
- आता अर्जाचा फॉर्म तुमच्या समोर असेल. त्यात आवश्यक माहिती भरा.
- फॉर्म भरल्यानंतर सर्व माहिती काळजीपूर्वक तपासा.
- आता अर्जाची फी भरा आणि सबमिट लिंकवर क्लिक करा.
- अर्जाची प्रिंट आउट घ्या.
दरम्यान, पात्र उमेदवारांकडून या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत असून ३० मे २०२४ या तारखेपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुरुवात होणार आहे. तर २८ जून ही अर्ज करण्याची अंतिम तारीख असून त्यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाही. तसेच दिलेल्या तारखेच्या आत उमेदवारांनी आपले अर्ज पाठवावे असे हवाई दलाकडून सांगण्यात आले आहे.