
जाणून घ्या देशात किती टक्के मतदान?
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksbaha Election) पाचव्या टप्प्यात देशातील ४९ जागांवर मतदान होत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार देशभरात सकाळी ११ वाजेपर्यंत अवघे २३.६६ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये चौथ्या टप्प्याप्रमाणेच पाचव्या टप्प्यातही पश्चिम बंगाल आघाडीवर आहे. पश्चिम बंगाल मध्ये ३२.७० टक्के मतदान झाले आहे. तर महाराष्ट्रात सर्वात कमी म्हणजेच १५.९३ टक्के मतदान झाले आहे.
बिहार – २१.११ जम्मू काश्मीर- २१.३७ झारखंड- २६.१८ लडाख- २७.८७ महाराष्ट्र- १५.९३ ओडिशा- २१.०७ उत्तरप्रदेश- २७.७६ पश्चिम बंगाल- ३२.७०
जाणून घ्या महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी किती टक्के मतदान?
महाराष्ट्रातील १३ जागांवर सकाळी ११ वाजेपर्यंत १५.९३ टक्के मतदारांनी हक्क बजावला. दिंडोरीत सर्वाधिक १९.५० टक्के मतदान झाले. भिवंडी – १४.७९ धुळे – १७.३८ दिंडोरी – १९.५० कल्याण – ११.४६ उत्तर मुंबई – १४.७१ उत्तर मध्य मुंबई – १५.७३ उत्तर पूर्व मुंबई – १७.०१ उत्तर पश्चिम मुंबई – १७.५३ दक्षिण मुंबई – १२.७५ दक्षिण मध्य मुंबई – १६.६९ नाशिक – १६.३० पालघर – १८.६० ठाणे – १४.८६